देशाचं नंबर 1 न्यूज नेटवर्क TV9चा ग्लोबल समिट कार्यक्रम जर्मनीच्या स्टर्टगार्ड सिटी येथे सुरु आहे. जर्मनीच्या ऐतिहासिक अशा MHP एरिना या फुटबॉल मैदानात तीन दिवसीय ग्लोबल समिटचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. या समिटच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘India: Inside the Global Bright Spot’ या विषयावर भाष्य केलं. इंडो-जर्म पार्टनरशिमध्ये आज एक नवा अध्याय जोडला जात असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलं. भारताच्या टीव्ही 9 ने जर्मनीत या ग्लोबल समिटचं आयोजन केलं आहे. “मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की, भारताचा एक मीडिया समूह आज इन्फोर्मेशन युगात जर्मनी आणि जर्मनीच्या नागरिकांसोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे भारतीय नागरिकांना देखील जर्मनी आणि जर्मनीच्या नागरिकांना समजण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळेल. तसेच न्यूज9 इंग्लिश चॅनल लॉन्च केलं जात आहे, याचादेखील मला आनंद आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारत-जर्मनी संबंधांवर देखील भाष्य केलं. “जर्मनीने फोकस ऑन इंडिया डॉक्युमेंट जारी केली आहे. भारत आणि जर्मनीचे संबंध शतकानुशतके जुने आहेत. आज जवळपास 3 लाख भारतीय जर्मनीत राहतात. भारत-जर्मनी संबंधांचा आणखी एक पैलू भारतात दिसून येतो. आज भारतात 1800 हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. आगामी काळात भारत आणि जर्मनी यांच्यातील व्यापार आणखी वाढेल असा मला विश्वास आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“भारत ही आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जर्मनीचे फोकस ऑन इंडिया डॉक्युमेंट हे त्याचे उदाहरण आहे. भारताने प्रत्येक क्षेत्रात नवीन धोरणे आखली आहेत. भारताने 30 हजारांहून अधिक कंप्लाइंसेस काढून टाकले. कर प्रणाली दुरुस्त केली. जेणेकरून आपला व्यवसाय प्रगती करू शकेल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Addressing the News9 Global Summit. @News9Tweetshttps://t.co/bOCjBBMFPc
— Narendra Modi (@narendramodi) November 22, 2024
“जर्मनीचा विकास प्रवासात उत्पादन आणि अभियांत्रिकीचा मोठा इतिहास आहे. कोणत्याही देशाच्या विकासासाठी आपण भौतिक, सामाजिक आणि डिजीटल क्षेत्रात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आज भारत मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे केंद्र आहे. आज भारतात अनेक जर्मन कंपन्या आहेत. मी आणखी जर्मन कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतो. भारताच्या प्रगतीत सामील होण्याची हीच योग्य वेळ आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.