नवी दिल्ली: रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने (Royal Swedish Academy of Sciences) 2021 वर्षाचे भौतिकशास्त्रासाठीचे (Physics) नोबेल पारितोषिक जाहीर केले आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने 2021 चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्युकुरो मनाबे (Syukuro Manabe), क्लाऊस हॅसलमन (Klaus Hassselmann) आणि जियोर्जियो पारिसी (Giorgio Parisi) यांना जाहीर झााला आहे. या तिघांना हा पुरस्कार त्यांच्या जटिल भौतिकशास्त्र प्रणालींच्या संशोधन कार्यासाठी देण्यात आला आहे.
BREAKING NEWS:
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2021 #NobelPrize in Physics to Syukuro Manabe, Klaus Hasselmann and Giorgio Parisi “for groundbreaking contributions to our understanding of complex physical systems.” pic.twitter.com/At6ZeLmwa5— The Nobel Prize (@NobelPrize) October 5, 2021
काल वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथील रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने जाहीर केले आहे. आतापर्यंत 216 जणांना भौतिकशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात चार महिलांचा समावेश आहे. 2020 मध्ये, भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक संयुक्तपणे रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेन्झेल आणि अँड्रिया गेझ यांना देण्यात आले.
नोबेल असेंब्लीनुसार भौतिकशास्त्रातील पुरस्काराचा उल्लेख अल्फ्रेड नोबेलने 1895 मध्ये त्याच्या मृत्यूपत्रात केला होता. त्यात म्हटले आहे की, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेकांनी भौतिकशास्त्राला विज्ञानाच्या अग्रभागी मानले होते. अल्फ्रेड नोबेलने देखील भौतिकशास्त्राकडं त्याच दृष्टीकोनातून पाहिलं होतं. त्याचे स्वतःचे संशोधन देखील भौतिकशास्त्राशी संबंधित आहे. रोख रकमेसह सुवर्णपदक दिले जाते. बक्षिसाची रक्कम अल्फ्रेड नोबेलच्या इच्छेने दिली जाते.
2021 च्या वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची (Nobel Prize 2021) घोषणा झाली आहे. 2021 चा वैद्यकिय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार डेव्हिड ज्युलिअस (David Julius) आणि अर्डेम पटापौटियन (Ardem Patapoutian) यांना मिळाला आहे. या दोघांनीही तापमान आणि स्पर्श संवेदना जाणवण्यासाठी रिसेप्टर्सवर संशोधन केलं आहे. आज भौतिकशास्त्रातील पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावे बुधवारी जाहीर केली जातील. गुरुवारी साहित्यासाठी नोबेल पारितोषिक, त्यानंतर नंतर शांतता आणि सर्वात शेवटी अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्याची घोषणा केली जाईल.
इतर बातम्या:
Nobel Prize 2020 Photos: कुणाला, कोणता नोबेल पुरस्कार मिळाला, पुरस्कार्थींची संपूर्ण यादी
Nobel Prize 2021 Syukuro Manabe Klaus Hasselmann and Giorgio Parisi award 2021 Nobel Prize in Physics declare by Royal Swedish Academy of Sciences