जग आणखी एका युद्धाच्या दिशेने, आता दक्षिण अन् उत्तर कोरियाने टेन्शन वाढवले…

| Updated on: Oct 15, 2024 | 10:17 AM

south korea and north korea: उत्तर कोरियाची वृत्तसंस्थाने म्हटले आहे की, या पत्रकांवर भडकाऊ आणि निरर्थक गोष्टी लिहिल्या होत्या. दक्षिण कोरियाने आपल्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे, जो लष्करी हल्ला मानला जाऊ शकतो.

जग आणखी एका युद्धाच्या दिशेने, आता दक्षिण अन् उत्तर कोरियाने टेन्शन वाढवले...
kim yo jong
Follow us on

south korea and north korea: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अनेक महिन्यांपासून सुरु आहे. संयुक्त राष्ट्रसंघासह बड्या देशांनाही ते युद्ध थांबवता आले नाही. त्यानंतर इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु झाले. इस्त्रायलने हमास, हिजबुल्लाह यांच्यावर हल्ले केले. या युद्धात इराणने उडी घेतली. त्यामुळे जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन युद्धांच्या परिस्थिती तिसऱ्या युद्धाचे पडघम वाजू लागले आहे. दोन शत्रू असलेले उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात तणाव वाढला आहे. यामुळे दोन्हीकडून युद्धाची धमकी देण्यात आली आहे.

दोन्ही देशांमध्ये वाद का?

दक्षिण कोरियावर उत्तर कोरियाने हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये ड्रोनमधून दक्षिण कोरियाने पत्रके टाकल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उनची बहीण किम यो-जोंग हिने दक्षिण कोरियाला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. दुसरीकडे दक्षिण कोरियाने प्योंगयांगला ड्रोन पाठवल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच उत्तर कोरियाने काही चुकीचे पाऊल उचलले तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला.

काय आहे उत्तर कोरियाचा दावा

उत्तर कोरियाने म्हटले आहे की, या महिन्यात तीन वेळा ड्रोनचा वापर करून प्योंगयांगमध्ये दक्षिण कोरियाने पत्रके टाकली आहे. या पत्रकांमध्ये उत्तर कोरिया सरकार आणि किम जोंग-उन यांच्या विरोधात गोष्टी लिहिल्या आहेत. हे ड्रोन दक्षिण कोरियाने पाठवल्याचा उत्तर कोरियाचा दावा आहे. उत्तर कोरियाची वृत्तसंस्थाने म्हटले आहे की, या पत्रकांवर भडकाऊ आणि निरर्थक गोष्टी लिहिल्या होत्या. दक्षिण कोरियाने आपल्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे, जो लष्करी हल्ला मानला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

दक्षिण कोरियाने काय म्हटले…

दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाने केलेले आरोप फेटाळले आहे. दक्षिण कोरियाने सांगितले की, उत्तर कोरिया त्यांच्या देशातील इंटर-कोरियन रस्त्ये नष्ट करत आहे. उत्तर कोरियाने सीमेवर स्क्रीन लावले असून त्यामागे रस्ते उद्ध्वस्त केले जात आहेत. दक्षिण कोरियाच्या मंत्रालयाचे प्रवक्ते कू ब्युंगसम यांनी सांगितले की, प्योंगयांगमध्ये ड्रोन उडवण्याचे आरोप केले जात आहेत जेणेकरून दक्षिण कोरियामध्ये अस्थिरता वाढू शकेल आणि उत्तर कोरिया आपली अंतर्गत स्थिती मजबूत करू शकेल.