Lebanon Pager Blast: बीप-बीप होताच पेजर्सचा स्फोट… हिजबुल्लावर ‘मोसाद स्टाइल’ हल्ल्याची इनसाइट स्टोरी

| Updated on: Sep 18, 2024 | 8:35 AM

Lebanon Pager Blast: एक संदेश आणि काही सेकंदांच्या बीप-बीपनंतर होत्याचं नव्हतं झालं...., 90 च्या दशकातील पेजर ठरला हल्ल्याचं कारण... हिजबुल्लावर 'मोसाद स्टाइल' हल्ल्याची इनसाइट स्टोरी...

Lebanon Pager Blast: बीप-बीप होताच पेजर्सचा स्फोट... हिजबुल्लावर मोसाद स्टाइल हल्ल्याची इनसाइट स्टोरी
Follow us on

Pager Attack In Lebanon: मंगळवारी दुपारी लेबनॉनमध्ये पेजर्सचा अचानक स्फोट झाला ज्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत तर, अनेक जण जखमी आहे. झालेल्या स्फोटामुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे. इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’ने हिजबुल्लाहवर पेजर्स हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. एक साधा कम्युनिकेशन डिव्हाइस सर्वकाही उद्ध्वस्त करु शकतो… याचा कोणी विचार देखील केला नसेल.

हिजबुल्लानुसार, मंगळवारी दुपारी जवळपास 3.30 च्या दरम्यान पेजर्स बीप-बीप करु लागले आणि स्फोट झाले. स्फोटांच्या काही तासांनंतर प्रत्येक पेजरच्या बॅटरीजवळ स्फोटके लावण्यात आल्याचं उघड झालं. प्रत्येक पेजरमध्ये स्फोट घडवता यावा यासाठी एक स्विच तयार करण्यात आला होता. दुपारी दुपारी 3.30 वाजता हिजबुल्लाह सदस्यांच्या पेजरवर एक संदेश आला आणि काही सेकंदांच्या बीप-बीपनंतर होत्याचं नव्हतं झालं.

मोसाद आणि IDF चे संयुक्त ऑपरेशन

लेबनॉन आणि सीरियातील हिजबुल्लाहच्या कार्यकर्त्यांना पेजर स्फोटांद्वारे लक्ष्य करण्यात आले. रॉयटर्स, सीएनएन, न्यूयॉर्क टाइम्ससह विविध माध्यम संस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, घडलेल्या हल्ला इस्रायल डिफेन्स फोर्स (आयडीएफ) आणि मोसादचं संयुक्त ऑपरेशन होतं. NYT च्या रिपोर्टनुसार, इस्रायलने तैवानमध्ये बनवलेल्या पेजरच्या बॅचमध्ये स्फोटके लावली होती. हे पेजर लेबनॉनने आयात करून हिजबुल्लाला दिले होते.

पेजरला कसं बनवलं गेलं विस्फोटक डिव्हाइस?

पेजर्सला ‘बीपर’ देखील म्हणतात. पेजर एक फार लहान डिव्हाइस आहे. ज्यामाध्यमातून फार लहान संदेश पोहचवले जातात. पेजर रेडिओ फ्रिक्वेंसीवर काम करतात. जेव्हा कोणता संदेश येतो, तेव्हा पेजर बीप करु लागतो. 90 व्या दशकात पेजरचा वापर फार मोठ्या प्रमाणावर व्हायचा. पण पेजर अद्यापही आरोग्यसेवा आणि आपत्कालीन सेवांमध्ये वापरले जातात.

मंगळवारी दुपारी 3.30 वाजता लेबनॉनमधील पेजर्सवर एक संदेश आला. संदेश हिजबुल्लाकडून आल्याचं दर्शवण्यात आल. पण त्या एक संदेशामुळे पेजर्समधील स्फोटके सक्रिय झाली. स्फोटापूर्वी पेजर्स काही सेकंद बीप करू लागले आणि त्यानंतर भयानक स्फोट झाले.

इस्रायलने पाळलंय मौन

घटलेल्या धक्कादायक घटनेनंतर लगेचच हिजबुल्लाने इस्रायलवर हल्ल्याचा आरोप केला. हिजबुल्लाहच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सदस्यांनी वापरलेल्या पेजर्स लिथियम बॅटरीने सुसज्ज होते. पण इस्रायलने या हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्यामागे आपला हात असल्याचेही म्हटले नाही.