Pakistan attack in iran | बलूच दहशतवादी संघटनेच्या तळावर गुरुवारी रात्री पाकिस्तानने एअर स्ट्राइक केला. इराणमध्ये घुसून पाकिस्तानने ही कारवाई केली. बुधवारीच इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तात प्रांतात घुसून एअर स्ट्राइक केला होता. त्या कारवाईचा बदला पाकिस्तानने घेतला. “इराणच्या सिस्तान, बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानने समन्वय साधून अचूकतेने दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. अनेक दहशतवादी यामध्ये मारले गेले” असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. “इराण आमचा बंधू देश आहे. पाकिस्तानी जनतेला इराणी नागरिकांबद्दल प्रेम आणि आपुलकी आहे” असं परराष्ट्र मंत्रालयाने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
पाकिस्तानकडून इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील एका गावावर क्षेपणास्त्र डागण्यात आली, इराणच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. बॉम्बस्फोटात तीन महिला आणि चार मुलांचा मृत्यू झाला. एकूण सात जणांचा मृत्यू झालाय. यात एकही इराणी नागरिक नाहीय, असं इराणच्या सुरक्षा अधिकाऱ्याने म्हटलं आहे. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या फुटीरतवादी संघटनांच्या तळावर पाकिस्तानने हा स्ट्राइक केला.
‘सप्रभुतेच उल्लंघन अजिबात मान्य नाही’
“आमच्या सप्रभुतेच उल्लंघन अजिबात मान्य नाही. गंभीर परिणाम भोगावे लागतील” असा इशारा पाकिस्तानने इराणच्या एअर स्ट्राइकनंतर दिला होता. दोन्ही देशांमध्ये चर्चेचे अनेक मार्ग असताना इराणने ही कारवाई केली असं पाकिस्तानच म्हणण होतं. मंगळवारी इराणने पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील जैश अल अदलच्या ठिकाणांवर हल्ला केला होता. यात 2 लहान मुलींचा मृत्यू झाला होता. जैश अल अदल ही दहशतवादी संघटना पाकिस्तान-इराण सीमेवर सक्रीय आहे. पाकिस्तानने पोसलेली ही संघटना इराणच्या सुरक्षा पथकांना लक्ष्य करत असतात.