भारताशी संबंध तोडल्यामुळे पाकिस्तान संकटात : आटा १६०, साखर १०० रुपये किलो

| Updated on: Jan 17, 2023 | 5:00 PM

पाकिस्तान-भारत संबंध चांगले असते तर साखर खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागले नसते. कारण भारत सवलतीच्या दराने साखर आयात करत आहे.

भारताशी संबंध तोडल्यामुळे पाकिस्तान संकटात : आटा १६०, साखर १०० रुपये किलो
नरेद्र मोदी व शहबाज शरीफ
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

लाहोर : pakistan economic crisis पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. पाकिस्तानातील जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत नाही. महागाई प्रचंड वाढली आहे. आटा १६०, साखर १०० रुपये किलो मिळत आहे. पाकिस्तानच्या परदेशी चलनाचा साठा गेल्या महिन्यात 294 मिलियन डॉलरने कमी होऊन 5.8 अब्ज डॉलरवर आला आहे. इतर देशांचं कर्ज फेडता येत नसल्याने पाकिस्तानवर ही परिस्थिती ओढवली आहे. पाकिस्तानने भारताशी व्यापारीक नाते तोडल्यामुळे त्यांची ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे पाकिस्तानला साखरेच्या आयातीवर जास्त खर्च करावा लागत आहे. लोकांना साखर आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांचा तुटवडा जाणवत आहे. पाकिस्तानमध्ये एक किलो साखर सुमारे 100 रुपयांना मिळते. जर पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडले नसते किंवा काही काळानंतर त्यात सुधारणा केली असती तर पाकिस्तानची परिस्थिती वेगळी असती. भारतातून साखर आयात केल्यानंतर त्यांना आयात खर्च खूपच कमी झाला असता.कारण दोन्ही देशातून रस्तेमार्गाने साखरेची वाहतूक कमी खर्चात झाली असती. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानच्या साखर उत्पादन क्षमतेत मोठी घट झाली आहे. साखरेसाठी ते आयातीवर अवलंबून झाले आहे, मात्र पाकिस्तानी रुपयाच्या कमजोरीमुळे साखरेची पुरेशा प्रमाणात आयात होत नाही.पाकिस्तान सध्या साखर पुरवठ्यासाठी UAE, ब्राझील, इजिप्त आणि अल्जेरिया या देशांवर अवलंबून आहे. पाकिस्तान-भारत संबंध चांगले असते तर साखर खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागले नसते. कारण भारत सवलतीच्या दराने साखर आयात करत आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तान वगळता जवळपास सर्व शेजारी देश भारतातून गहू, साखर इत्यादी वस्तूंच्या आयातीवर तुलनेने कमी खर्च करत आहेत. बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आदी देश भारतातून मोठ्या प्रमाणात गहू आयात करत आहे. पाकिस्तान तुपासाठी विदेशी आयातीवरही अवलंबून आहे. भारत हा जगातील तुपाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. पण भारताशी व्यापार तोडल्यामुळे पाकिस्तान सिंगापूर, यूएई अशा दूरच्या देशांतून तूप खरेदी करत आहे.

गेल्या वर्षी पाकिस्तानात आलेल्या पुरामुळे गव्हाचे पीक उद्ध्वस्त झाले होते. पाकिस्तानमधील गव्हाचे देशांतर्गत उत्पादन पूर्णपणे घटले आहे. त्यांना आता आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. एक किलो पिठासाठी लोकांना 160 रुपये मोजावे लागतात. पाकिस्तानमध्ये 100 किलो गव्हाच्या पोत्याची किंमत 12 हजार 500 रुपयांवर गेली आहे.