कंगाल पाकिस्तान रात्रीतून मालामाल, पाकिस्तानला लागला जॅकपॉट, येणाऱ्या पिढ्या आरामात जगणार

| Updated on: Jan 13, 2025 | 9:18 PM

Pakistan Gold Reserves : पाकिस्तानमध्ये असलेल्या या खादानीवर जगाचे लक्ष आहे. यासाठी कॅनडाच्या कंपनीने पाकिस्तानसोबत करार केला आहे. आता सौदी अरेबिया पाकिस्तान सरकारसोबत चर्चा करत आहे. रेको डिककडे जगातील 5 व्या क्रमांकाचे तांबे आणि सोन्याचे साठे आहेत.

कंगाल पाकिस्तान रात्रीतून मालामाल, पाकिस्तानला लागला जॅकपॉट, येणाऱ्या पिढ्या आरामात जगणार
पाकिस्तानात सोन्याच्या खाणी मिळाल्या.
Follow us on

Pakistan Gold Reserves : कंगाल पाकिस्‍तानला जॅकपॉट लागला आहे. त्यामुळे जगभरात पाकिस्तान बातम्यांचा विषय झाला आहे. पाकिस्तानला 800 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे सोने मिळाले आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतत सिंधु नदी किनाऱ्यावर 32 किमी परिसरात सोन्याची खान मिळाली आहे. हे सोने 653 टन असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतचे माजी मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानच्या जियोलॉजिकल सर्व्हे व‍िभागाने 127 ठिकाणी तपासणी केल्यानंतर सोने मिळाल्याची पुष्टी केली आहे.

सिंधू संस्कृतीमुळे सिंधू नदी

सिंधू नदी ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे. 3300 ते 1300 इसवी सनपूर्व दरम्यान सिंधू संस्कृतीचा विकास सिंधू नदीच्या काठावर झाला. 1947 च्या फाळणीपूर्वी सिंधू नदी पूर्णपणे भारतात होती. आज ही नदी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधून वाहते. त्यामुळे दोन्ही देशांसाठी सिंधू नदीचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.

या ठिकाणी सोने

कंगाली आणि दिवाळखोरीत पाकिस्तान सध्या आहे. परंतु सोन्याची खान मिळाल्यामुळे पाकिस्तानचे दिवस पलटणार आहे. पाकिस्तानची येणारी पिढी आरामात खाऊ शकणार आहे. पाकिस्तानला आधीच बलुचिस्तान प्रांतात सोने मिळाले आहे. या भागातील रेको डिक खाण सोन्याच्या आणि तांब्याच्या मोठ्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. हा जगातील पाचव्या क्रमांकाचा सोन्याचा साठा असल्याचे मानले जाते. त्या ठिकाणी सोने काढण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानमध्ये असलेल्या या खादानीवर जगाचे लक्ष आहे. यासाठी कॅनडाच्या कंपनीने पाकिस्तानसोबत करार केला आहे. आता सौदी अरेबिया पाकिस्तान सरकारसोबत चर्चा करत आहे. रेको डिककडे जगातील 5 व्या क्रमांकाचे तांबे आणि सोन्याचे साठे आहेत. 0.41% तांबे आणि 41.5 दशलक्ष औंस सोने त्या ठिकाणी आहे. हे सोने किमान 40 वर्षे वापर केला जाऊ शकतो.

बलुचिस्तानमधील रेको डिक कॉपर आणि गोल्ड माइन प्रोजेक्टसाठी कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये मागील वर्षी चर्चा झाली. पाकिस्तानी कॅबिनेटने 540 मिलियन डॉलर पैकी 15 टक्के भागेदारी विक्रीसाठी मंजुरी दिली होती.