पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष अधिकच चिघळत आहे. पाकिस्तानने नुकतीच अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये हल्ले वाढले आहे. दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांच्या सीमा रेषेत घुसून कारवाई करत आहे. सोमवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या आठ नागरिकांची हत्या केली. तसेच १३ जण गंभीर जखमी झाले.
पाकिस्तानने पक्तिया येथील एका मशिदीवर रॅकेट हल्ला केला. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अफगाणिस्तानने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय दखल देण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमधील नागरिकांना लक्ष केले जात असल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे.
टोलो न्यूजमधील रिपोर्टनुसार, तालिबान संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, डूरंड लाइनवर दोन्ही बाजूंनी हिंसक चकमक होत आहे. तालिबानने पाकिस्तानी लष्कराच्या दोन चौक्यांवर कब्जा केला आहे. तालिबानी सैनिकांनी ड्युरंड रेषेवर असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्या जाळल्या आहेत. या हल्ल्यात पाकिस्तान लष्कराचे १९ सैनिक ठार झाले आहेत. त्यानंतर अनेक सैनिक चौक्या सोडून पळून गेले आहे. त्याचे व्हिडिओ अफगाणिस्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहे. तालिबाने पाकिस्तानचा ध्वज काढून आपला ध्वज लावला आहे.
📹🇦🇫🇵🇰 Footage Allegedly Shows Moment Taliban Forces Take Over Pakistani Outpost & Raise Flag https://t.co/ryVVVjbsBb pic.twitter.com/CecbtupMsW
— RT_India (@RT_India_news) December 30, 2024
तालिबानीकडून गोजगढी, माटा सांगर, कोट राघा आणि मेंगल भागात जोरदार हल्ले केले जात आहे. दुसरीकडे पाकिस्ताने म्हटले आहे की, पाकिस्तान लष्कराने खुर्रम आणि उत्तरी वजीरिस्तान भागात तालिबानकडून होणारी घुसखोरी रोखली आहे. दरम्यान, तालिबानने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या हल्ल्यात ५० नागरिकांचा मृत्यू झाली आहे. त्यात अनेक महिला आणि मुले आहेत. यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दखल घेतली गेली पाहिजे.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील २६४० किमी लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे नाव ड्युरंड लाइन आहे. ही रेषा पश्तून आदिवासी भागातून आणि दक्षिणेकडील बलुचिस्तानमधून जाते. ही रेषा पश्तून आणि बलुच या दोन भागांत विभागली आहे. ती जगातील सर्वात धोकादायक सीमा देखील मानली जाते. या सीमेवरुन दोन्ही देशांत वाद आहे.