इम्रानच्या अटकेपूर्वी पाकिस्तानात हाय होल्टेज ड्रामा, PTI समर्थक अन् पोलिसांमध्ये जुंपली

| Updated on: Mar 14, 2023 | 5:17 PM

सत्ताधारी पाकिस्तानी डेमोक्रेटिक मूवमेंटने निवडणूक आयोगाकडे तोशाखाना भेट प्रकरण उचलले होते. इम्रानने आपल्या कार्यकाळात विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची विक्री केल्याचे सांगण्यात आले.

इम्रानच्या अटकेपूर्वी पाकिस्तानात हाय होल्टेज ड्रामा, PTI समर्थक अन् पोलिसांमध्ये जुंपली
Follow us on

लाहोर : पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खानच्या अटकेवरुन सध्या हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. इस्लामाबाद न्यायालयाने एका महिला न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी इम्रान खान विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी केले आहे. यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पोहचली आहे. परंतु त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हंगामा सुरु केलाय. यामुळे पोलिसांना इम्रान यांना अटक करणे अवघड होत आहे. परंतु इम्रान यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश पोलिसांकडे आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेपूर्वीच रस्त्यावर संघर्ष सुरू झाला आहे. लाहोरमधील त्यांच्या घरी पोहोचलेल्या पोलिसांना समर्थकांच्या प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. लाहोरच्या रस्त्यावर पीटीआय समर्थक आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमकही झाली आहे. समर्थकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि पाण्याच्या तोफांचा वापर करून जमावाला पांगवले. हिंसाचाराची शक्यता पाहता पोलीस चिलखती वाहनांसह इम्रान खानच्या घरी पोहोचले आहेत.

काय आहे प्रकार

हे सुद्धा वाचा

तोशाखाना प्रकरणात एका महिला न्यायाधीशाला धमकावल्याबद्दल आणि कोर्टात हजर न राहिल्याबद्दल इम्रान खानविरोधात दोन अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याच्यावर अनेक दिवसांपासून अटकेची टांगती तलवार आहे. यापूर्वी इस्लामाबाद पोलीस हेलिकॉप्टरमधून इम्रानला अटक करण्यासाठी पोहोचले होते. पण अत्यंत हुशारीने इम्रानने घरही सोडले आणि थेट रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले. समर्थकांच्या गर्दीत इम्रानला पकडणेही पोलिसांना अवघड झाले आहे.

कोणत्या प्रकरणात अटक होणार

सत्ताधारी पाकिस्तानी डेमोक्रेटिक मूवमेंटने निवडणूक आयोगाकडे तोशाखाना भेट प्रकरण उचलले होते. इम्रानने आपल्या कार्यकाळात विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची विक्री केल्याचे सांगण्यात आले. इम्रानने निवडणूक आयोगाला सांगितले होते की, त्याने या सर्व भेटवस्तू तोशाखान्यातून 2.15 कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या, त्यानंतर त्याची विक्री केल्यावर 5.8 कोटी रुपये मिळाले. परंतु तपासात ही रक्कम 20 कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले.

तोशाखाना प्रकरणात दिलासा नाही

28 फेब्रुवारीला इम्रानला अनेक खटल्यांमध्ये हजर करण्यात आले. वेगवेगळ्या कोर्टात सुनावणी झाली. त्यात त्यांना तोशाखान प्रकरण वगळता इतर प्रकरणात दिलासा मिळाला. पण तोशाखाना प्रकरणात त्याच्यावर अटकेची टांगती तलवार कायम राहिली आहे. न्यायालयाने इम्रानविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.