भारताचा सच्चा मित्र कंगाल पाकिस्तानच्या मदतीसाठी धावला, पाकच्या फायद्याची डील

| Updated on: Apr 03, 2023 | 1:30 PM

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झालेल्या पाकिस्तानला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे. दोन्ही देशांनी या संदर्भात करार केलाय.

भारताचा सच्चा मित्र कंगाल पाकिस्तानच्या मदतीसाठी धावला, पाकच्या फायद्याची डील
pakistan crisis
Follow us on

Pakistan Economic Crisis : कंगाल झालेल्या पाकिस्तानसाठी एक चांगली बातमी आहे. तेल संकटाचा सामना करताना पाकिस्तानला थोडा दिलासा मिळणार आहे. भारताचा सच्चा मित्र यामध्ये पाकिस्तानला मदत करणार आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक हालत खूपच खराब आहे. दोनवेळच जेवण मिळवण्यासाठी त्या देशात मारामाऱ्या सुरु आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोसळली आहे. पाकिस्तानला या संकटातून बाहेर येण्याचा मार्ग दिसत नाहीय.

या कठीण काळात पाकिस्तानला भारताच्या जवळच्या मित्राने मदत केली आहे. पाकिस्तानसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे. दोन्ही देशांनी या संदर्भात करार केलाय.

भारतासारखाच करार पाकिस्तानसोबत

रशियाने भारतासोबत एक करार केलाय, तसाच करार रशियासोबत करण्यास पाकिस्तानला यश मिळालय. रशिया भारताला स्वस्तात कच्च तेल उपलब्ध करुन देतो. आता रशिया पाकिस्तानला सुद्धा स्वस्तात कच्च तेल उपलब्ध करुन देणार आहे, पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्य मंत्री मुसादिक मलिक यांनी ही माहिती दिली.

पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले

पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. अशावेळी रशियाकडून स्वस्त दरात उपलब्ध होणार तेल पाकिस्तानसाठी मोठा दिलासा आहे.

चार आठवड्यांचा कालावधी

कॅश संकटाने त्रस्त असलेल्या पाकिस्तानला पुढच्या महिन्यात क्रूड ऑइल देण्याची रशियाची योजना आहे. ऑर्डर केल्यानंतर तेल पाकिस्तानला मिळण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी लागेल, असं पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्य मंत्री मुसादिक मलिक म्हणाले.

आर्थिक कर्जाचा मोठा बोजा

पाकिस्तानवर आर्थिक कर्जाचा मोठा बोजा आहे. पाकिस्तान रशियाकडून स्वस्तात क्रूड ऑईल खरेदी करण्यासाठी उत्साहित आहे. पाकिस्तान सरकार रशियाकडून स्वस्तात क्रूड ऑइल खरेदी करण्याचा विचार करत आहे, असं पाकिस्तानचे अर्थमंत्री इश्हाक डार यांनी मागच्यावर्षी सांगितलं होतं. पाकिस्तान वर्तमानपत्र डॉनमध्ये हे वृत्त प्रसिद्ध झालं होतं.
भारतही रशियाकडून कच्च तेलं विकत घेतोय. पाकिस्तानला आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे. असं इश्हाक डार म्हणाले होते. पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्य मंत्री मुसादिक मलिक तेल आणि गॅससह अन्य मुद्यांवर चर्चेसाठी रशियाला गेले होते. त्यानंतर पाकिस्तान सरकारने रशियाकडून स्वस्तात क्रूड ऑइल खरेदी करण्याची घोषणा केली.