कराची, दि.28 जानेवारी 2024 | पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतविरोधी दहशतवाद्यांची हत्या होत आहे. या घटनाक्रमानंतर पाकिस्तानने भारतावर आरोप केले आहेत. भारत घरात घुसून आमच्या एजंटाची हत्या घडवत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, भारतीय एजंट पाकिस्तानी भूमीवर त्यांच्या लोकांची हत्या घडवत असल्याचे पुरावे आमच्याकडे आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सायरस काजी यांनी आपण हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघासमोर उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना परराष्ट्र सचिव सायरस काजी यांनी म्हटले की, पाकिस्तानमध्ये राहत असलेल्या भारताला हवे असणाऱ्या लोकांना भारत टारगेट करत आहे. शाहिद लतीफ आणि मुहम्मद रियाज यांची काही महिन्यांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. शाहिद पठाणकोठ हल्ल्यातील मास्टरमाइंड होता. पाकिस्तानी नागरिक रियाज याची हत्या मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झाली होती. पाकव्याप्त काश्मीरमधील एका मशिदीत त्याची हत्या झाली होती. अन्य एक पाकिस्तानी व्यक्ती लतीफ याची ऑक्टोंबर महिन्यात हत्या झाली होती. हे सर्व भारतासाठी मोस्ट वॉटेंड होते.
भारत पाकिस्तानमध्ये हत्यासत्र घडवण्याचे काम शिताफीने करत आहे. त्यासाठी भारताने तिसऱ्या देशातील लोकांचा वापर सुरु केला आहे. भारतीय एजंट लहान गुन्हेगार आणि जिहाद्दी प्रवृत्तीच्या लोकांना लालच देऊन वापर असल्याचे परराष्ट्र सचिवांनी सांगितले. भारतीय एजेंट योगेश कुमार आणि अशोक कुमार आनंद ही जबाबदारी पार पाडत आहे. सायरस काजी यांनी तिसऱ्या देशाचे नाव यावेळी सांगितले नाही.
सायरस म्हणाले की, मुहम्मद अब्दुल्ला अली याने शाहिदची हत्या केली होती. त्याच्यावर ही जबाबदारी देण्यासाठी भारतीय एजंटांनी सोशल मीडिया ॲप टेलिग्रामचा वापर केला. या ॲपद्वारे त्यांना शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही उपलब्ध करून दिला. पाकिस्तानकडे या आरोपींच कबुलीजबाब आणि हत्यांशी संबंधित पुरावे आहे. भारतीय एजंटांनी त्यांच्याशी पैशाचे व्यवहार केल्याचे पुरावे आहेत.