Masood Azhar : ‘मसूद अजहरला अटक करा!’ पत्र लिहून पाकिस्तानची चक्क कोणत्या देशाकडे मागणी?

| Updated on: Sep 14, 2022 | 11:40 AM

Masoon Azhar :1 मे 2019 रोजी संयुक्त राष्ट्र संघात मसूज अजहर याचं नाव आंतरराष्ट्रीय अतिरेक्यांच्या यादीमध्ये नोंदवलं गेलं होतं. 2009 साली भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेनंही जैश ए मोहम्मद संघटनेला विदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केलं होतं.

Masood Azhar : मसूद अजहरला अटक करा! पत्र लिहून पाकिस्तानची चक्क कोणत्या देशाकडे मागणी?
मसूद अजहर
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई : पाकिस्तानने (Pakistan) चक्क पत्र लिहून कुख्यात अतिरेकी मसूद अजहर (Terrorist Masson Azhar) याच्या अटकेची मागणी केली आहे. अफगणिस्तानला (Afghanistan) पाकिस्तानने हे पत्र लिहिलं आहे. अतिरेकी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या असलेल्या मसूद अजहरच्या अटकेची मागणी करत पाकिस्तानने लिहिलेलं पत्र, हे जागतिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घडामोड मानली जाते आहे.

अतिरेकी मसूद अजहर हा अफगणिस्तानच्या नंगरहार किंवा कुन्हरमध्ये असल्याची शक्यता पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेनं वर्तवली आहे. तसा उल्लेख पत्रातही करण्यात आला आहे. मसूद अजहर याला शोधून त्याला अटक केली जावी, अशी मागणी पाकिस्तानने केलीय. पत्र लिहून अफगणिस्तानकडे तशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाकिस्तानमधील विदेश मंत्रालयाने सदर पत्र अफगणिस्तानच्या अधिकाऱ्यांना लिहिलं असल्याचं पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

कोण आहे मसूद अजहर?

मसूद अजहर हा एक कुख्यात अतिरेकी आहे. तो जैश ए मोहम्मदचा प्रमुख असल्याचंही सांगितलं जातं. 1 मे 2019 रोजी संयुक्त राष्ट्र संघात मसूज अजहर याचं नाव आंतरराष्ट्रीय अतिरेक्यांच्या यादीमध्ये नोंदवलं गेलं होतं. 2009 साली भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेनंही जैश ए मोहम्मद संघटनेला विदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केलं होतं.

हे सुद्धा वाचा

अतिरेकी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि अतिरेकी मसूद अजहर यांचं नाव जागतिक अतिरेकी संघटनांच्या यादीत नोंदवलं जावं, अशी मागणी भारताकडून संयुक्त राष्ट्र संघात करण्यात आली होती. मात्र या मागणीत चीन सातत्यानं खोडा घालत असल्याचं दिसून आलंय.

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

एफएटीएफ म्हणजेच फायनेन्शियल एक्शन टास्क फोर्सच्या दबावामुळे पाकिस्ताने पत्र लिहून मसूद अजहरच्या  अटकेची मागणी केली असावी, असंही बोललं जातंय. दहशतवादाच्या विरोधात कारवाई केली जावी, असा सल्ला एफएटीएफच्या वतीने पाकिस्तानला देण्यात आलाय. याच कारणामुळे पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद मीर याचाही खात्मा केला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

मसूद अजहर हा अफगणिस्तानात लपला आहे, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. असं असलं तरी, पाकिस्तानातील सोशल मीडिया नेटवर्कवर मसूद अजहर आपले लेख पोस्ट करुन दहशतवादाला खतपाणी घालत असल्याच्याही नोंदी समोर आल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानने लिहिलेल्या पत्रातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे की खरंच अफगणिस्तानातून मसूद अजहर या अतिरेक्याला अटक केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.