मुंबई : कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) संपूर्ण जगावर मोठं संकट ओढावलं आहे. आता ओमिक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) फैलावामुळेही संपूर्ण जग चिंतेत आहे. अशावेळी कोरोना लसीकरण हा एकमेव उपाय सध्या सांगितला आहे. मात्र, इंजेक्शन घेण्यापासून अनेकजण अजूनही घाबरत असल्याचं दिसून येत आहे. अशा लोकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीय. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानं (Food and Drug Administration) आता Pfizer च्या Paxlovid या टॅब्लेटच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. कोरोना उपचारासाठी तोंडावाटे घेता येणारं हे पहिलं औषध आहे.
The U.S. Food and Drug Administration has given emergency authorization to Pfizer’s COVID-19 treatment drug, Paxlovid. It’s the first oral drug specifically designed for COVID-19. #Paxlovid #Pfizer #COVIDdrug #CGTNAmerica pic.twitter.com/0Afrt9rXaz
— CGTN (@CGTNOfficial) December 22, 2021
फायझच्या कोविड टॅब्लेटच्या आपत्कालीन वापराला युरोपियन युनियन औषध नियामक विभागानं आठवड्याभरापूर्वी मंजुरी दिली आहे. अमेरिकन औषध कंपनी असलेल्या फायझरने दावा केला आहे की, ”फायझरची कोविड टॅबलेट ओमायक्रॉन व्हेरियंटवर प्रभावी आहे. या टॅबलेटचा वापर करुन रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि कोरोनाबळींची संख्या कमी करण्यास 90 टक्के परिणामकारक ठरेल.”
गोळीमध्ये पॅक्सलोविड (Paxlovid) हे नवीन रेणू PF-07321332 आणि HIV अँटीव्हायरल रिटोनावीर (Ritonavir) यांचे संयोजन आहे, जे वेगळ्या टॅबलेट म्हणून घेतल्या जाते. युरोपियन मेडिसिन एजन्सीने याबाबत सांगितलं की, कोरोनाचे निदान झाल्यानंतर आणि लक्षणे दिसल्यानंतर 5 दिवसांच्या आत पॅक्सलोविडचा वापर शक्य तितक्या लवकर करावा. अशावेळी फायझरच्या टॅबलेट आणखी 5 दिवस घ्याव्यात.
कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली की, त्यांची अँटीव्हायरल गोळी लॅबमध्ये झालेल्या परीक्षणांमध्ये ओमिक्रॉनविरोधात प्रभावी दिसली आहे. युरोप, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेत ओमिक्रॉनच्या केसेस झपाट्याने वाढत आहे. फायझरचे सीईओ अल्बर्ट बोर्ला म्हणाले की, आम्हाला खात्री आहे की, जर या गोळीचा वापर करण्यास मंजूरी मिळाली तर ही कोरोना महामारीपासून आरोग्याचे संरक्षणात्मक कवच प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण सिद्ध होईल. गेल्या महिन्यात फायझरने फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) या गोळीसाठी मंजूरी मागितली होती.
इतर बातम्या :