टोकिया | 2 जानेवारी 2024 : उगवत्या सूर्याचा देश असणाऱ्या जपानला सध्या संकटांनी घेरलं आहे. जपानमध्ये भूकंपाची घटना ताजी असताना आज टोकिया विमानतळावर एक वाईट घटना घडली आहे. टोकिया विमानतळावर विमानाचं लँडिंग केलं जात असताना विमानाला भीषण आग लागली. जंगलात ठिणगीने वणवा पेटावा अगदी तशी ही आग ठरली. या आगीने संपूर्ण विमानावर ताबा घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विमानाला लागलेली आग किती भीषण आहे हे दर्शवणारे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. अगदी विमानाच्या खिडक्यांपासून त्याच्या खालच्या बाजूला मोठी आग लागली आहे. विमानतळ प्रशासन, अग्मिशन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
ही आग विमानाचं लँडिंग करत असताना लागली. आग लागलेलं विमान दुसऱ्या विमानाला धडकल्याने ही घटना घडल्याची शंका सुरुवातीला वर्तवली जात होती. पुढे हीच माहिती खरी ठरली. या विमानात 300 पेक्षा जास्त प्रवासी होते, अशी माहिती मिळत आहे. सुदैवाने सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Breaking: A Japan Airlines plane caught fire on the runway at Haneda Airport in Tokyo. pic.twitter.com/zoIVQu63Fh
— PM Breaking News (@PMBreakingNews) January 2, 2024
आग लागलेल्या विमानाचा नंबर JAL 516 असं आहे. या विमानाने होक्काइडो येथून उड्डाण घेतलं होतं. जपान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, विमानात 367 प्रवासी होते. या सर्व प्रवाशांना सुखरुप विमानातून बाहेर काढण्यात आलं आहे. खरंतर सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांनी देवाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, जपान एयरलाईन्सने या घटनेवर अधिकृत माहिती दिली आहे. हे विमान होक्काइडोच्या न्यू चिटोस विमानळाहून टोकियोच्या हनेडा विमानतळावर पोहोचलं होतं. या विनानाचा नंबर 516 असा होता. हे विमान टोकियोच्या हनेडा विमानतळावर उतरल्यानंतर ते तिथल्या तटरक्षक विमानाला धडकलं. त्यामुळे हा अपघात घडला. जपानच्या एनएचके वृत्तसंस्थेने सर्वात आधी या घटनेचं वृत्त देत व्हिडीओ जारी केला होता. घटनेनंतर जपानच्या पंतप्रधानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विमानतळावर एजन्सीजमध्ये समन्वय साधण्यासाठी आपातकालीन कक्ष स्थापन केला आहे.