पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष विमानाने मॉस्कोमध्ये उतरतील, त्यावेळी तिथल्या थंड हवेत त्यांचं उत्साही, जोरदार स्वागत होईल. रशिया आणि भारतामधील संबंध नवीन नाहीत. शीत युद्धापासून दोन्ही देशांमध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर या संबंधांच महत्त्व आणखी वाढलय. भारत आणि रशियाची मैत्री शीत युद्धाच्या काळात आणखी घट्ट झाली. त्यावेळी जग दोन गटांमध्ये विभागलेलं होतं. भारत आणि रशियाने एकमेकांना साथ दिली. सध्या पाश्चिमात्य देशांनी खासकरुन अमेरिका, युरोपियन देशांनी रशियावर प्रतिबंध लादले आहेत. या संकटकाळात भारत आणि चीन रशियाचे सर्वात मोठे तेल खरेदीदार देश बनले आहेत. भारत आणि रशियाचे रणनितीक संबंध यातून लक्षात येतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने युक्रेन संघर्षावर एक संतुलित धोरण स्वीकारलं. दोन्ही देशांनी शांततामय मार्गाने तोडगा काढावा, ही भारताची भूमिका आहे. त्याचवेळी भारताने रशियावर टीका करण सुद्धा टाळलं. कुठल्याही बाजूला नाराज न करता यातून भारताच कुटनितीक कौशल्य दिसून येतं.
भारत-रशिया संबंधात आव्हान काय?
रशिया आणि भारताची मैत्री आता अधिक घट्ट होत चालली आहे. त्यामुळे दोन्ही देशांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. चीन हा भारताचा मुख्य स्पर्धक आहे, आज तो सुद्धा रशियाच्या तितक्याच जवळ आहे. हे त्रिकोणी संबंध इतके किचकट आहेत की, पीएम मोदी यांनी शंघाई सहयोग संघटनेच्या (SCO) शिखर सम्मेलनात सहभागी होण्याऐवजी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना कजाकिस्तानच्या अस्ताना येथे बैठकीसाठी पाठवलं. या बैठकीला रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग सुद्धा हजर होते.
10 वर्षात मोदी-पुतिन कितीवेळा ऐकमेंकाना भेटले?
पीएम मोदी शेवटचे 2019 मध्ये व्लादिवोस्तोक येथे रशियन दौऱ्यावर गेले होते. एका आर्थिक गोष्टीसाठी हा दैरा होता. त्याआधी ते 2015 मध्ये मॉस्को दौऱ्यावर गेलेले. पुतिन आणि पीएम मोदी यांची शेवटची भेट सप्टेंबर 2022 मध्ये उज्बेकिस्तानच्या SCO शिखर सम्मेलनात झाली होती. पुतिन 2021 साली दिल्लीत आलेले. मागच्या दहा वर्षात दोन्ही नेत्यांनी 16 वेळा परस्परांची भेट घेतली आहे.
कोणाचा जळफळाट होईल?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशियन दौरा रणनितीक दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचा आहे. त्याचवेळी पीएम मोदींच्या या दौऱ्याने अमेरिका आणि अन्य युरोपियन देशांचा जळफळाट होऊ शकतो. कारण युक्रेन युद्धामुळे हे देश सातत्याने पुतिन यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचवेळी मोदी मैत्री धर्म निभावणार.