पावसासाठी देवाकडे प्रार्थना करा, सौदी अरेबियाच्या राजाने लोकांना का केलं असं आवाहन

| Updated on: Nov 27, 2024 | 7:31 PM

सौदी अरेबियात पाऊस पडत नाही. हा एक वाळवंट प्रदेश आहे. आत किंग सलमान यांनी देशातील जनतेला पावसासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. पैगंबर मुहम्मद यांंनी ही परंपरा सुरु केली होती.

पावसासाठी देवाकडे प्रार्थना करा, सौदी अरेबियाच्या राजाने लोकांना का केलं असं आवाहन
Follow us on

सौदी अरेबियाचे शासक किंग सलमान यांनी लोकांना पावसासाठी देवाकडे प्रार्थना करण्याचं आवाहन केले आहे. किंग सलमान यांनी सौदी अरेबियातील लोकांना यासाठी नमाज अदा करण्याचे आवाहन केलंय. गुरुवारी सर्वांनी पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना करा असं त्यांनी म्हटलंय. सौदी अरेबियामध्ये पाऊस किंवा दुष्काळ नसताना विशेष प्रार्थना करण्याची आणि पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्याची परंपरा आहे. पाऊस नसताना देखील लोकं पावसासाठी येथे प्रार्थना करतात. हा सौदी इस्लामिक परंपरेचा एक भाग मानला जातो. सौदी अरेबियामध्ये पावसासाठी केलेल्या विशेष प्रार्थनेला इस्टिस्का असे म्हणतात. जी संपूर्ण सौदी अरेबियामध्ये केली जाते.

सौदीमध्ये असा विश्वास आहे की, जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा पैगंबर मुहम्मद यांनी खास नमाज इस्तिष्का पठण करून पाऊस पडावा म्हणून अल्लाहकडे प्रार्थना केली होती. तेव्हापासून सौदीतील लोकं ही परंपरा पुढे नेत आहेत. इस्तिका ही दोन रकात प्रार्थना आहे. ज्यात पहिल्या रकात सात तकबीर असतात तर दुसऱ्या रकात सहा तकबीर असतात. ही नमाज सौदी अरेबियामध्ये वर्षानुवर्षे सुरु आहे. पश्चिम चंपारणमध्ये दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी सामूहिक नमाज अदा केली आणि अल्लाहकडे पावसाची विनंती केली.

सौदी अरेबियाची भौगोलिक स्थिती अशी आहे की तेथे पाऊस फारच कमी आहे. गेल्या काही वर्षांत वातावरणातील बदलामुळे सौदीतील हवामानातही बदल होत आहेत. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. सौदी अरेबियाच्या अनेक भागात सध्या पाण्याची कमतरता असून लोक पावसाच्या आशेने आकाशाकडे बघत आहेत. अशा परिस्थितीत पाऊस झाल्यास लोकांना दिलासा मिळणार आहे.

सौदी अरेबिया हा तसा वाळवंट प्रदेश आहे. येथे उष्णता खूप असते. पण गेल्या वर्षी येथे भरपूर पाऊस झाला होता. ज्यामुळे अनेक ठिकाणी पूर देखील आला होता. सौदी अरेबिया हा तसा संपन्न देश आहे. आज तो श्रीमंत देशांपैकी एक आहे.