PM modi qutar Visit : सोमवारी सकाळी भारतीयांना एक मोठी गुडन्यूज मिळाली. कतारने १८ महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. या माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने सुरुवातीला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भारताकडून त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. या दरम्यान दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याची शक्यता होता. पण असं असतानाच काही दिवसांपूर्वी पीएम मोदी आणि कतारचे अमीर यांच्यात भेट झाली होती. या भेटीत देखील हा मुद्दा मांडला गेला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मंगवळवारी UAE दौऱ्यावर जाणार आहे. पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी रोजी दोहा येथे कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीसाठी जाणार आहेत. अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी केलीये. ऑगस्ट 2022 पासून कतारमध्ये सुमारे 18 महिन्यांपासून अटकेत असलेल्या आठ भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेनंतर भारताच्या राजनैतिक विजयानंतर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक दृढ आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्याची संधी मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा कतार दौरा आहे. याआधी जून 2016 मध्ये त्यांनी कतार दौरा केला होता. भारत आणि कतार यांच्यातील वाढत्या संबंधांवर भर देत परराष्ट्र सचिवांनी कतारमध्ये होत असलेल्या या दोन मोठ्या नेत्यांच्या भेटींचा उल्लेख केला.
काही दिवसात भारत आणि कतार यांच्यात व्यापार व्याढला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची दोहा भेट आणि जून 2022 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट. त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या 3 ते 4 वर्षांत कतारला अनेक भेटी दिल्या आहेत. त्यामुळे कतार आणि भारत यांच्यात संबंध चांगले झाले आहेत.
भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय व्यापार सध्या अंदाजे USD 20 अब्ज इतका आहे. कतार भारतातील विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूकदार म्हणून पुढे येत आहे. भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय संबंध सातत्याने वाढत आहेत.
कतार एनर्जी आणि भारताच्या पेट्रोनेट यांच्यात 2028 पासून सुरू होणाऱ्या 20 वर्षांच्या कालावधीसाठी कतारकडून भारताला प्रतिवर्षी 7.5 दशलक्ष मेट्रिक टन एलएनजी पुरवठ्यासाठी अलीकडील कराराचा उल्लेख करताना, क्वात्रा म्हणाले, “नुकत्याच झालेल्या निष्कर्षांनंतर तुम्हाला माहिती असेल. इंडिया एनर्जी वीक, कतार एनर्जी आणि इंडियाज पेट्रोनेट यांनी 2028 पासून 20 वर्षांसाठी कतररकडून भारताला प्रतिवर्षी 7.5 दशलक्ष मेट्रिक टन एलएनजी पुरवण्यासाठी करार केला होता”.
कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आठ नागरिकांची सोमवारी कतारने सुटका केली. नवी दिल्लीच्या राजनैतिक हस्तक्षेपानंतर फाशीची शिक्षा तुरुंगवासात बदलण्यात आली. नंतर आता त्यांची सुटका करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईतील COP28 शिखर परिषदेच्या बाजूला कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची भेट घेतली होती.