PM modi in UAE : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय UAE दौऱ्यासाठी अबुधाबीला पोहोचले आहेत. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी अबुधाबीमध्ये बांधलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीहून संयुक्त अरब अमिराती आणि कतारच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले. ते UAE सोबत द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच, दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारीला ते हिंदू धर्माचे केंद्र असलेल्या अबू धाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी त्यांच्या UAE दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात UAE च्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. भारतीय समुदायातील लोकांनाही संबोधित करणार आहेत. यादरम्यान ते अबुधाबीमध्ये BAPS द्वारे बांधण्यात आलेल्या भव्य हिंदू मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमाला अहलान मोदी असे नाव देण्यात आले आहे.
UAE मध्ये PM मोदी UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. 9 जानेवारी रोजी ‘व्हायब्रंट गुजरात 2024’ दरम्यान गुजरातमध्ये त्यांची भेट झाली. उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांचीही ते भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट केले की, “माझे भाऊ मोहम्मद बिन झायेद यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. पुढील दोन दिवसांत, या देशांसोबत भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मी UAE आणि कतारला भेट देईन.
#WATCH | Abu Dhabi, UAE: Prime Minister Narendra Modi and President of UAE Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, share a hug. PM Modi was also accorded Guard of Honour upon his arrival. pic.twitter.com/MSLhuTEv8d
— ANI (@ANI) February 13, 2024
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी आणि UAE चे अध्यक्ष ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा व्यापार, बंदरे, रेल्वे आणि सागरी लॉजिस्टिक, डिजिटल पायाभूत सुविधा, भांडवल प्रवाह आणि यासह विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करतील अशी अपेक्षा आहे. 2015 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर यूएईची ही त्यांची सातवी भेट असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेण्याव्यतिरिक्त, PM मोदी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 ला देखील उपस्थित राहतील, जिथे ते एक विशेष मुख्य भाषण देतील.
#WATCH | Abu Dhabi: Memorandum of Understanding (MoUs) being exchanged between India and UAE in the presence of UAE President Mohammed bin Zayed Al Nahyan and Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/RAOO2PxC4i
— ANI (@ANI) February 13, 2024
पंतप्रधान झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियमवर अबुधाबीमधील भारतीय लोकांना संबोधित करतील. अबुधाबीमध्ये भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या ‘अहलान मोदी’ कार्यक्रमाने अभूतपूर्व लक्ष वेधून घेतले आहे. 65,000 हून अधिक नोंदणी झाली आहे.
पीएम मोदी 13-14 फेब्रुवारीपर्यंत UAE मध्ये राहणार असून त्यानंतर ते दोहाला जाणार आहेत. कतारची ही भेट खास असणार आहे. कारण कतारने कालच आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. ज्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.