PM Modi At UNGA: अफगाणिस्तानचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी केला जाऊ नये, मोदींनी पाकसह चीनलाही ठणकावलं

| Updated on: Sep 25, 2021 | 7:24 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तान आणि चीनला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कडक शब्दात ठणकावलं. (Prime minister narendra modi address united nations general assembly unga speech)

PM Modi At UNGA: अफगाणिस्तानचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी केला जाऊ नये, मोदींनी पाकसह चीनलाही ठणकावलं
65 तासात आटपल्या 24 बैठका; अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदींकडून वेळेचं अचूक व्यवस्थापन
Follow us on

वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तान आणि चीनला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कडक शब्दात ठणकावलं. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी केला जाऊ नये. तुम्ही दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर केला तर तो तुमच्यासाठीही घातक ठरू शकतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला ठणकावलं. (Prime minister narendra modi address united nations general assembly unga speech)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत बोलताना हा इशारा दिला. मोदींनी हिंदीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. मोदी यांनी आपल्या तब्बल अर्ध्या तासाच्या भाषणात भारताची संस्कृती, परंपरा आणि मोदी सरकारने गेल्या सात वर्षात केलेल्या कामाची माहिती जगाला दिली. तसेच भारतासह जगावर आलेलं कोरोनाचं संकट आणि या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने दिलेलं योगदान यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तान आणि चीनचं नाव न घेता या दोन्ही देशांचे कान उपटले.

जो देश दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहेत, त्यांनीही हाच दहशतवाद त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो याचं भान ठेवावं, असं सांगतानाच अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होता कामा नये. त्यासाठी आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे, असं आवाहन मोदींनी केलं. अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना आपली गरज आहे. त्यामुळे त्यांना मदत करणं हे आपलं दायित्व आहे, असंही ते म्हणाले.

 

75 उपग्रह अंतराळात सोडणार

जेव्हा निर्णय घ्यायची वेळ होती, तेव्हा ज्यांच्यावर जगाला उत्तर देण्याची जबाबदारी होती ते काय करत होते, असा प्रश्न आपल्या येणारी पिढी विचारेल. त्यामुळे विज्ञाला विकासाचा आधार बनाववेच लागेल. भारतात डिजीटल युगाची सुरूवात झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत 75 सॅटेलाईट अंतराळात पाठवणार आहे. भारतीय विद्यार्थी हे सॅटेलाईट शाळा-महाविद्यालयात बनवत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

 

भारतात या आणि लसीची निर्मिती करा

यावेळी त्यांनी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं. जगभरातील व्हॅक्सिन बनविणाऱ्यांना मी आमंत्रण देत आहे. या आणि भारतात व्हॅक्सिन बनवा, असं मोदी म्हणाले. भारतात कोविन अॅपमुळे लसीकरणाचा वेग वाढला आहे. भारताकडून जगातील गरीबांना लस देण्यास सुरुवात झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे:

>> मागील 7 वर्षात भारतात 43 कोटीपेक्षा जास्त लोक बँकिंग व्यवस्थेशी जोडला गेला आहे. 36 कोटीपेक्षा अधिक अशा लोकांना विमा कवच मिळालं आहे, जे त्याबाबत आधी विचारही करत नव्हते. 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत उपचाराचा लाभ देत त्यांना क्वालिटी हेल्थशी जोडलं आहे.

>> भारताचा व्हॅक्सिन डिलीव्हरी प्लॅटफॉर्म कोवीन एका दिवसात कोट्यवधी व्हॅक्सिन डोस देण्यात डिजीटल सहाय्यता देत आहे. मी UNGA ला ही माहिती देऊ इच्छितो की भारताने जगातील पहिली DNA व्हॅक्सिन विकसीत केली आहे. ही व्हॅक्सिन 12 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना दिली जाऊ शकते.

>> भारताचे वैज्ञानिक एक नेजल व्हॅक्सिनच्या निर्माण कार्यात लागले आहेत. मानवते प्रति आपलं दायित्व लक्षात घेता भारताने पुन्हा एकदा जगाला व्हॅक्सिन देणं सुरु केलं आहे.

>> दुषित पाणी ही भारतच नाही तर जगातील सर्व, खासकरुन गरीब आणि विकसनशील देशांसाठी मोठी समस्या आहे. भारतात या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही 17 कोटीपेक्षा अधिक घरापर्यंत पाईप लाईनद्वारे पानी पोहोचवण्याचं मोठं कार्य केलं आहे. (Prime minister narendra modi address united nations general assembly unga speech)

 

संबंधित बातम्या:

PM Modi in US: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासंदर्भात चर्चा, मोदी-बायडन भेटीत आश्वासक सूर

PM Modi in US : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात दीड तास चर्चा, 5 महत्वाचे मुद्दे

पाकिस्तानी सैनिकांच्या काफिल्यावर बलूचींचा हल्ला, मोठ्या प्रमाणात सैनिक मारले गेल्याची साशंकता

(Prime minister narendra modi address united nations general assembly unga speech)