न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. मंगळवारी न्यूयॉर्कच्या मेडिसन एवेन्यू रोडवर खूपच गजबज होती. वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठ मोठ्या लोकांची येथे ये-जा सुरु होती. अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. याच ठिकाणी जगातील श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिडटाऊन मॅनहॅटनच्या या प्रतिष्ठीत हॉटेलमध्ये अनेक उच्च विद्याविभूषित, हेल्थ एक्सपर्ट आणि व्यावसायिकांची भेट घेतली. 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कच्याच वाल्डोर्फ एस्टोरिया हॉटेलमध्ये उतरले होते.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रसिद्ध न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलमध्ये उतरलेत, त्या बद्दल जाणून घ्या….
1) हॉटेलच्या वेबसाइटनुसार, न्यूयॉर्क पॅलेस न्यूयॉर्कमधील सर्वात आयकॉनिक आणि लँडमार्क हॉटेल आहे. द पॅलेस आणि द टॉवर्स असं दोन्ही प्रकराची अकॉमडेशन व्यवस्था या हॉटेलमध्ये आहे.
2) 563 फूट उंचीच्या या हॉटेलची 51 मजली गगनचुंबी इमारत आहे.
3) वर्ष 1874 मध्ये हॅरी हेम्सले नावाच्या एका डेवलपरने विलार्ड हाऊसच्या साइटवर 55 मजली हॉटेल बांधायचा प्रस्ताव दिला होता. हेम्सले पॅलेस असं त्या हॉटेलला नाव देण्यात येणार होतं. 1882 पासून हे हॉटेल सुरु झालं.
4) 1981 मध्ये हेम्सले पॅलेस असं या हॉटेलच नाव झालं.
5) 1992 मध्ये ब्रुनेईच्या सुल्तानने हे हॉटेल विकत घेतलं. 2011 मध्ये हे हॉटेल नॉर्थवूड इन्वेस्टर्सला विकण्यात आलं.
6) दक्षिण कोरियाच्या लोटे हॉटेल आणि रिसॉर्ट्ने वर्ष 2015 मध्ये या लग्झरी हॉटेलच अधिग्रहण केलं.
7) 141 वर्ष हे जुनं हॉटेल अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. 800 पेक्षा अधिक रुम्स या हॉटेलमध्ये आहेत.
8) या हॉटेलमध्ये एकदिवस मुक्कामाच भाडं 48 हजार रुपयापासून 12 लाखापर्यंत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले. आज ते वॉशिंग्टन डीसीमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जील बायडेन यांना भेटले. पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ स्टेट डिनरच आय़ोजन करण्यात आलय. 23 जूनला अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन पंतप्रधान मोदींच स्वागत करतील.