वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे (PM Modi US Visit). आज ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेणार आहेत. व्हाईट हाऊसमध्ये या दोन्ही मोठ्या नेत्यांची बैठक होईल. बायडन आणि मोदी एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे. बायडन अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर, दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी अनेक वेळा व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधला आहे. आजच्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय मुद्द्यांसह अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सविस्तर चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी कोविड कालावधीनंतर प्रथमच अमेरिकेत पोहोचले आहेत. 2019 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्यूस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला मोदींनी हजेरी लावली होती. ( Prime Minister Narendra Modi will attend the Quad Summit after US President Joe Biden’s visit today. )
बायडन आणि पीएम मोदी या भेटीनंतर क्वाड संमेलनाला हजेरी लावतील. जो बिडेन यांनी या शिखर परिषदेचे आयोजन केलं आहे. पीएम मोदी, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन या क्वाड शिखर परिषदेला उपस्थित राहतील. मार्चमध्ये क्वाड नेत्यांमध्ये व्हर्च्युअल बैठक झाली होती. आज होणाऱ्या क्वाड बैठकीत, जगभरातील कोरोना लसीचा आढावा घेण्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
पंतप्रधान मोदींनी पहिल्या दिवशी कमला हॅरिस यांची भेट घेतली
अमेरिकन दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि अमेरिकेला नैसर्गिक सहकारी म्हणून संबोधलं. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी विश्वास व्यक्त केला की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध नवीन उंचीवर पोहोचतील. पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनाही भारत भेटीचे आमंत्रण दिले.
Glimpses from the meeting between PM @narendramodi and @VP @KamalaHarris. pic.twitter.com/cc6wFTGe5s
— PMO India (@PMOIndia) September 23, 2021
सामरिक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा
मोदी-हॅरीस बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिकेतील सैन्य भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला. याशिवाय अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भेटण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी, भारतातील कोविड संकटात हॅरिस यांनी मोदींशी फोनवर चर्चा केली होती. हॅरिसने भारताला अमेरिकेचा “अत्यंत महत्वाचा भागीदार” म्हटलं आहे. यावर्षी एप्रिलमध्ये, महामारीची दुसरी लाट देशात आल्यानंतर भारताने कोविड लसींची निर्यात थांबवली. सोमवारी, भारताने सांगितले की “लस मैत्री” कार्यक्रमांतर्गत 2021 च्या चौथ्या तिमाहीत लसीची निर्यात सुरु होईल.
हेही वाचा: