नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु असतानाच आता रशियाने देशव्यापी अणू युद्ध सरावाची घोषणा केली आहे. त्यामुळे पाश्चिमकडील देशांचे टेन्शन वाढले आहे. अमेरिकेन संरक्षण मंत्रालयाने एका अहवालाच्या आधारे दावा केला आहे की इराण येत्या काही दिवसात अण्वस्र तयार करणार आहे. त्यामुळे अमेरिकेने आपल्या उपग्रहांद्वारे होणारी टेहळणी वाढविली आहे. अहवालात म्हटले आहे की रशिया, चीन, उत्तर कोरिया देखील या प्रकरणात इराणला मदत करीत आहे. या चार देशांच्या ( चीन, रशिया, इराण आणि उत्तर कोरिया – CRIK ) चौकडीने अण्वस्र प्रसार बंदी कराराचे उल्लंघन केल्याने चिंता वाढली आहे.
इराण येत्या दोन आठवड्यात अणूबॉम्ब तयार करु शकतो असे अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या स्ट्रॅटेजी फॉर काऊटरींग वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन रिपोर्ट 2023 ने म्हटले आहे. इराणकडे 14 दिवसात अण्वस्र तयार करण्याएवढा कच्चा माल तयार आहे. इराण अण्वस्र तंत्रज्ञान आणि अणूबॉम्बसाठी आवश्यक ढाचा तयार असल्याचे अहवालातून उघड झाले आहे. अणूबॉम्बसाठी आवश्यक युरेनियम इराणने तयार केले आहे. इराणने अनेक महत्वाच्या स्थानांवर कॅमेरे लावण्यास नकार दिला आहे. त्यामुळे युरेनियमबाबत नेमकी माहीती मिळालेली नाही. इराणच्या डोंगराळ भागात बोगदे खोदून तयारी केली आहे. हे बोगदे इराण-इराक सीमेवरील डोंगराळ भागात नंताज न्यूक्लिअर साईटवर आहेत.
अमेरिका, ब्रिटन सह नाटोसदस्य असलेले 31 देश या चौकडीच्या हेतूमुळे भयभयीत झाले आहेत. यामुळे इस्रायल आणि सौदी अरेबिया अणूबॉम्बची तयारी वेगाने करतील अशी भीती जगाला सतावत आहे. तसेच रशियाच्या अण्वस्र युद्धाचा सराव सुरु करण्याच्या घोषणेने तणाव वाढला आहे. इराणच्या दोन आठवड्यात अणू बॉम्बची चाचणी करण्याच्या शक्यतेने इस्रायल इराणच्या न्युक्लिअर साईटवर अण्वस्र हल्ले करण्याचा धोका वाढला आहे. यामुळे सर्व जगच अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशियाने आपल्या हल्ला केल्यास त्याची अणूहल्ला करण्याची धमकी दोन वेळा पाश्चात्य देशांना दिली आहे. सोव्हीएत रशियाने शेवटची अणू चाचणी 1990 मध्ये केली होती. अमेरिकेची शेवटची चाचणी 1992 मध्ये तर फ्रान्स आणि चीनने शेवटची अणू चाचणी 1996 मध्ये केली होती.