नवी दिल्ली- स्वप्न हा प्रत्येकाची अत्यंत वैयक्तिक आणि गूढ बाब. पण केवळच मनुष्यच स्वप्न (Dream)बघू शकतात का, इतर पृथ्वीरचे प्राणीही स्वप्न बघत असतील का, अनेकदा आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांना (Pet) आपण झोपेत हसताना पाहतो. कदाचित त्यावेळी ते स्वप्न पाहत असतील किंवा एखादा चांगला क्षण आठवून त्याचा आनंद घेतल असतील. सध्या आपण चर्चा करुयात ती उंदिरांची. एका संशोधकाने दावा केला आहे की, उंदीरही (Rats)माणसांप्रमाणेच स्वप्न पाहू शकतात. त्यांच्या स्वप्न पाहण्याच्या या प्रक्रियेमागेही माणसांसारखेच विज्ञान आहे. अमेरिकेत याबाबत एक अभ्यास नुकताच करण्यात आला. कॅलिफोर्निया विद्यापीठीतील रिसर्चर युता सेनताई आणि मस्सीमो सकैजियानी यांची एकत्रित हा अभ्यास केला आहे. या संशोधकांनुसार झोपताना तुमच्या डोळ्यांतील बुबुळांमध्ये होत असलेल्या तीव्र हालचालींमुळे स्वप्न पडतात. त्यावरुन स्वप्न काय प्रकारची असू शकतात, याचाही अंदाज घेता येतो. डोळ्यांमध्ये असलेल्या मासपेशींना जो धक्का बसतो, त्यातून ही स्वप्न पडत असतात.
१९५० च्या सुरुवातीच्या दशकात रॅपीड आय मूव्हमेंटच्या शोधानंतर डोळ्यात होणाऱ्या हालचालींकडे वैज्ञानिक, मानसोपचारतज्ज्ञांचे लक्ष गेले होते. माणसांप्रमाणेच उंदिरही अशाच प्रकारची निद्रा करतात. रॅपिड आय मूव्हमेंट झोपेचा अर्थ असा आहे की, झोपताना पापण्या पूर्ण मिटण्यापूर्वी किंवा त्या काळात तुमच्या डोळ्यात विशेषता बुबळांच्या तीव्र हालचाली होतात. त्याच काळात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने पडतात. संशोधकांनी झोपलेले असताना आणि जागे असताना मेंदूत होत असलेल्या बदलांचा आणि सूचनांचा अभ्यास केला. त्यात नवनव्या बाबी समोर आल्या आहेत.
स्वप्न का बघितली जातात आणि कशा स्वरुपाची स्वप्ने बघतात, याचा शोध डोळ्यांच्या बुबळांच्या हालचालींवरुन करण्याचा प्रयत्न संशोधक करीत आहेत. झोपेतून उठण्यापूर्वी पडत असलेले स्वप्न आणि बुबळांची त्यावेळी असलेली दिशा याचा काही संबंध आहे का, याचाही शोध घेण्यात येतो आहे. दुर्दैवाने या संशोधनाचे विरोधाभासी परिणाम दिसत आहेत. त्यामुळे या अभ्यासात किंवा प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या आहेत का, याचाही विचार करण्यात येतो आहे. संशोधकांनी स्वप्नांचा अधिक शोध घेण्यासाठी झोपलेल्या उंदिरांच्या मेंदूतील विद्युत लहरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.