2021मधील 70व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलेविषयी जाणून घ्यायला सर्वांनाच उत्सुकता आहे. ती महिला आहे मनसा वाराणसी...
मिस इंडिया 2020चे जज फाल्गुनी शेन पीकॉक, नेहा धुपिया, चित्रांगदा सिंग आणि पुलकित सम्राट यांनी केले. अपारशक्ती खुराना यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात मनसा वाराणसीला मिस इंडिया वर्ल्ड 2020चा मुकुट देण्यात आला.
मनसाचा जन्म हैदराबाद येथे झाला आणि त्या financial information exchange analyst आहेत. 23 वर्षीय वाराणसींनी वसावी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले आहे.
मनसा एक लाजाळू मुलगी होती. त्यांनी भरतनाट्यम आणि संगीतामध्ये आपली आवड जोपासली आहे.
पुस्तक वाचन, संगीतयामध्ये विशेष आवड आहे. सहसा लक्ष न दिल्या जाणार्या गोष्टींचे निरीक्षण करणे हा त्यांचा छंद आहे. अशा बाबींमध्ये त्या स्वतः लक्ष घालतात.