Bangladesh Violence : भारताचा शेजारी बांगलादेश अस्थिरतेचा गर्तत आला आहे. बांगलादेशात निर्माण झालेल्या हिंसाचाराची चर्चा जगभरात सुरु झाली आहे. बंगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. बांगलादेशात गरीबी, बेरोजगारी असल्यानंतर अनेक अब्जाधीश आहेत. त्यांची दिवसभराची कमाई लाखोंमध्ये आहेत. बांगलादेशमधील अब्जाधिशांची नेटवर्थ सातत्याने वाढत आहेत. बांगलादेशात सर्वात श्रीमंत कोण आहे? शेख हसीन यांच्यापेक्षा 40 हजार पट जास्त संपत्ती त्यांच्याकडे आहे.
बांगलादेशमधील अब्जाधिशांची चर्चा होत असताना सलमान एफ रहमान, तारेक रहमान आणि सजीब वाजेद जॉय यांची नावे समोर येतात. हे अब्जाधीश नेहमी बांगलादेशात चर्चेत असतात. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जनशक्ती भर्ती फर्म DATCO ग्रुपचे फाउंडर आहेत. त्यांचे नाव मूसा बिन शमशेर आहे. मूसा बिन आंतरराष्ट्रीय शस्त्र खरेदी-विक्रीचे डिलर आहेत. माध्यमांमधील बातम्यानुसार, त्यांची संपत्ती 12 बिलियन डॉलर म्हणजेच 99,600 कोटी आहे. शेख हसीना यांच्याकडे 2.48 कोटींची संपत्ती आहे. म्हणजेच मूसा बिन शमशेर यांच्याकडे शेख हसीनापेक्षा 40 हजारपट जास्त संपत्ती आहे.
बांगलादेशमधील श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सलमान एफ रहमान आहे. ते बांगलादेशातील सर्वात मोठा उद्योग समूह बेक्सिमको ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांच्याकडे 2 बिलियन डॉलर म्हणजेच 16,600 कोटींची संपत्ती आहे. यानंतर बांगलादेशाच्या श्रीमंतांच्या यादीत तारेक रहमान यांचे नाव येते. ते माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे चिरंजीव आहे. त्यांच्याकडे 1.7 बिलियन डॉलर म्हणजे 14,110 कोटींची संपत्ती आहे. आईसीटी कंपनी सिनैप्सचे चेअमरन सजीब वाजेद जॉय यांच्याकडे 1.5 बिलियन डॉलरची संपत्ती आहे. म्हणजेच ते 12,450 कोटींचे मालक आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे ते आयसीटी सल्लागारही होते.
सईद अबुल हुसैन बंगालादेशमधील एपेक्स ग्रुपचे चेअरमन आणि एमडी आहे. ते बांगलादेश असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज (BAPI) चे चेअरमन आहे. त्यांच्याकडे 1.2 बिलियन म्हणेज 9,960 कोटींची संपत्ती आहे.
हे ही वाचा…