ब्रिटनमध्ये (Britain) पंतप्रधानपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतीय वंशांच्या ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी मोठी आघाडी घेतली आहे. बुधवारी एलिमिनेशन फेरीसाठी मतदान झाले. यामध्ये सुनक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून पंतप्रधापदासाठी इच्छूक आहेत. एलिमिनेशन फेरीत सुनक यांना एकूण 88 एवढे मतं पडली. या मताची टक्केवारी 25 टक्के एवढी आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या पंतप्रधानपदाच्या आणखी एक प्रमुख दावेदार पेनी मॉर्डंट (Penny Mordant)यांना 19 टक्के म्हणजेच 67 मतं मिळाली. या शर्यतीत लिझ ट्रॉस हे 14 टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत, त्यांना एकूण 50 मते मिळाली. केमी बेदनोक यांना एकूण 40 मते मिळाली असून, ते चौथ्या स्थानावर आहेत. तर टॉम टुजेंट 37 मतांसह पाचव्या स्थानावर आणि सुएला ब्रेव्हरमन या 9 टक्के मतांसह सहाव्या क्रमांकावर आहेत, त्यांना एकूण 32 मतं मिळाली आहे. एलिमिनेश फेरीत आघाडीवर असलेल्या सुनक यांच्यापुढे आता पक्षातील खासदारांचा पाठिंबा मिळवण्याचे आव्हान असणार आहे. तर या फेरीत नधीम जहावी आणि जर्मी हंट हे बाहेर झाले आहेत.
ऋषी सुनक यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान असणार आहे ते म्हणजे आपल्या पक्षातील खासदारांचा पाठिंबा मिळवण्याचे. सुनक हे सध्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून पंतप्रधानपदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. या पक्षात नेता निवडण्यासाठी एका समितीची स्थापना केली जाते. या समितीमध्ये पक्षाचे खासदार असतात. नॉमिनेशन, एलिमिनेशन आणि फायनल सिलेक्शन अशा तीन मार्गाने या पक्षात नेत्याची निवड केली जाते. यामध्ये सुनक यांचे नॉमिनेशन झाले आहे. एलिमिनेशन राऊंड सध्या सुरू आहे. या फेरीत ऋषी सुनक हे सध्या आघाडीवर आहेत. या फेरीसाठी एकूण आठ उमेदवार होते. त्यातील दोघांना कमी मते मिळाल्याने ते बाहेर पडले आहेत. आता लढत ऋषी सुनक, पेनी मॉर्डंट, लिझ ट्रॉस, केमी बेदनोक, टॉम टुजेंट आणि सुएला ब्रेव्हरमन या सहा जणांमध्ये आहे.
सध्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून पंतप्रधापदासाठीच्या एलिमिनेशन फेरीला सुरुवात झाली आहे. ज्या उमेदवाराला या फेरील तीसपेक्षा कमी मत पडतील तो उमेदवार या फेरीतून बाद होतो. ब्रिटनच्या राज्यघटनेनुसार असाच उमेदवार पंतप्रधानपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो, ज्याच्याकडे कमीत कमी तीस खासदारांचे समर्थन आहे. सध्या तरी या स्पर्धेमध्ये ऋषी सुनक हे आघाडीवर आहेत.