इंग्लंडमध्ये उत्खननादरम्यान पुरातन विभागाला सापडली अशी गोष्ट, पाहून सगळेच थक्क

| Updated on: Mar 06, 2023 | 11:54 AM

ब्रिटनमध्ये उत्खननादरम्यान 4000 वर्षे जुने एक वास्तू सापडली आहे. या दरम्यान आणखी काही रहस्य उलगडू शकतात असं पुरातत्व शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

इंग्लंडमध्ये उत्खननादरम्यान पुरातन विभागाला सापडली अशी गोष्ट, पाहून सगळेच थक्क
Follow us on

लंडन : इंग्लंडमधील नॉर्थॅम्प्टनजवळील ( Northampton ) पुरातन स्थळी पुरातत्व विभागाच्या संशोधकांना जे सापडले ते पाहून सगळेच थक्क झाले आहेत. पुरातत्व विभागाला उत्खननादरम्यान या ठिकाणी प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष प्राचीन संस्कृतीशी संबंधित असल्याचे सांगितले जातेय. या मंदिराचे अवशेष 4 हजार वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. इतिहासाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत महत्त्वाची असल्याचं पुरातत्त्वविभागाने म्हटले आहे.

पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमला रोमन सभ्यतेशी संबंधित एक प्राचीन रचना सापडली आहे. या रचनेबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की येथे दोन खोल्या असाव्यात. एका खोलीतून पायऱ्या वरच्या मजल्यावर जातात. हे ठिकाण पूजा किंवा प्रार्थनास्थळ असावे. कोणत्याही दैनंदिन कामासाठी त्याचा वापर केला जात नसावा. ब्रिटनमध्ये एकच नाही तर अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे रोमन साम्राज्याच्या काळात मंदिरे बांधली गेली आहेत.

म्युझियम ऑफ लंडन आर्कियोलॉजी (MOLA) मधील पुरातत्व विभाग नॉर्थम्प्टनजवळील ओव्हरस्टोन येथे उत्खनन करत आहे. हे ठिकाण इतिहासाशी निगडीत असल्याने संशोधक येथे उत्खनन करत आहेत. तज्ञांचे मत आहे की या जागेचा वापर 2 हजार वर्षांहून अधिक काळ केला जात आहे. त्यांनी सांगितले की या ठिकाणी आतापर्यंत कांस्य युग आणि रोमन सभ्यतेशी संबंधित अनेक गोष्टी सापडल्या आहेत. येथे एखादं प्रार्थनास्थळ किंवा मंदिरा सारखे सारखे काहीतरी असावे. असं त्यांचं मत आहे.

लंडन पुरातत्व संग्रहालयाचे पुरातत्वशास्त्रज्ञ सायमन मार्कस यांनी बीबीसीला सांगितले की, “प्राचीन काळात स्थानिक समुदायांसाठी या ठिकाणाला खूप महत्त्व आले असावे.” समाधीखाली कोणतेही मानवी अवशेष नसल्याचा अर्थ असा असू शकतो की लोक या ठिकाणी राहत नसत, तर त्याचा उपयोग पूजास्थळ किंवा प्रार्थना सारख्या गोष्टींसाठी केला गेला असता.

म्युझियम ऑफ लंडन आर्कियोलॉजी (MOLA) ने सांगितले की या जागेवर त्यांचे काम सुरूच राहील. या ठिकाणाजवळील धबधब्यामुळे आणखी महत्त्वाच्या गोष्टींचा शोध घेता येईल, असे पुरातत्वशास्त्रज्ञांचे मत आहे. या प्राचीन जागेवरील सर्वात जुना शोध समाधीचा होता, जो 1500 ते 2000 बीसी दरम्यान बांधला गेला असेल. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमला या समाधीवर कांस्य युगातील पाच अंत्यसंस्काराचे कलशही सापडले. मात्र, या ठिकाणी अद्याप कोणतीही मानवी थडगी किंवा अवशेष सापडलेले नाहीत.

काही दिवसांपूर्वी इराणमधील पुरातत्वशास्त्रज्ञांना एका ऐतिहासिक ठिकाणी उत्खननात प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. हे मंदिर प्राचीन इराणशी संबंधित आहे. हे मंदिर प्राचीन इराणमधील सर्वात शक्तिशाली साम्राज्यांपैकी एक असलेल्या ‘ससानिद’ बद्दल असल्याचे सांगितले जात आहे.