रशियाने तालिबानचा भविष्यातील धोका लक्षात घेऊन पाऊले उचलण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी रशियाने अफगाण सीमा भागात सैन्य अभ्यास घेण्याचे ठरविले आहे.
रशिया आणि तजाकिस्तानने संयुक्तरित्या अफगाणिस्तानच्या सीमा भागात सैन्य पाठविले आहे. तर दुसरीकडे तजाकिस्ताननेही तालिबानचा ठिकाणा लावण्यासाठी कंबर कसली आहे. तजाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमा भागात सैन्य अभ्यास केला. तालिबानच्या अफगाणिस्तानातील वाढत्या प्रभावामुळे तजाकिस्तानने यापूर्वीच सीमा भागात 20 हजार सैनिक तैनात केले आहे.
रशिया उज्बेकिस्तान आणि तजाकिस्तानसोबत मिळून अफगाण सीमेवर सैन्य अभ्यास करण्याच्या तयारीत आहे. तजाकिस्तानने यापूर्वीच एकदा येथे सराव केला. त्यांच्या राष्ट्रपतींनी तर सैन्याला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
तजाकिस्तानच्या राखीव सैनिकांपैकी 1 लाख 30 हजार तर सक्रीय 1 लाख सैनिकांनी अफगाण सीमा भागात सैन्य अभ्यास करून एका प्रकारने तालिबानला इशाराच दिलाय. तसेच यावेळी तजाकिस्तानचे राष्ट्रपती इमोमाली रहमान यांनी अफगाणिस्तानातील संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे म्हटले. तसेच सध्याच्या परिस्थितीत आमच्या लोकांसाठी शांतपूर्ण वातावरण निर्माण करणे हे आमचे प्राथमिक लक्ष्य असल्याचे ते म्हणाले.