Photo : कीवनंतर रशियाचे खार्किवर हल्ले, हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; प्रचंड प्रमाणात वित्तहानी

| Updated on: Mar 02, 2022 | 9:01 AM

गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच असल्याने या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनची राजधानी कीवनंतर आता रशियाने आपला मोर्चा युक्रेनमधील दुसऱ्या क्रमाकांचे मोठे शहर खार्किवकडे वळवला आहे. हल्ल्यामध्ये खार्किवचे मोठे नुकसान झाले आहे.

1 / 7
गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच असल्याने या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनची राजधानी कीवनंतर आता रशियाने आपला मोर्चा युक्रेनमधील दुसऱ्या क्रमाकांचे मोठे शहर खार्किवकडे वळवला आहे. हल्ल्यामध्ये खार्किवचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्यांमध्ये खार्किवमधील अनेक प्रशासकीय इमरती भुईसपाट झाल्या आहेत. तसेच या हल्ल्यात एक भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा याचा मृत्यू झाला आहे.

2 / 7
खार्किवमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात प्रशासकीय इमारतीबाहेर पार्क केलेल्या वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आपण या छायाचित्रांमध्ये पाहू शकता की, खार्कीवमध्ये एका प्रशासकीय इमारतीबाहेर लावलेली ही कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

3 / 7
खार्किवमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा याचा मृत्यू झाला आहे. त्याला श्रद्धांजली वाहनण्यासाठी दिल्लीत युवक काँग्रेसच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला. तो वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेला होता.

4 / 7
.

.

5 / 7
खार्किवमध्ये सातत्याने रशियाचे हल्ले सुरूच आहे. या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सिटी हॉलच्या इमारतीवर झालेल्या गोळीबारानंतर सेंट्रल स्क्वेअरचे मोठे नुकसान झाले आहे. याच ठिकाणी एका महिलेचा मृतदेह पडल्याचे दिसून येत आहे.

6 / 7
 दरम्यान रशियाने खार्किवमध्ये केलेल्या गोळीबारानंतर सिटी हॉल इमारतीच्या बाहेर युक्रेनियन आपत्कालीन सेवा कर्मचारी दाखल झाले आहेत. गोळीबारात जखमी लोकांना त्यांच्याकडून मदत पुरवण्यात येत आहे.

7 / 7
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा सर्वच स्थरातून निषेध करण्यात येत आहे. अमेरिकेसह अनेक युरोपीयन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.