रशियामध्ये आज आणखी एक भयंकर ब्लास्ट झाला आहे. या स्फोटात रशियाच्या न्यूक्लिअर प्रोग्रामचा प्रमुख इगोर किरिलोव ठार झाले आहेत. मॉस्को शहरात हा स्फोट झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. इगोर किरिलोव हे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे अत्यंत जवळचे होते. रशियाच्या राष्ट्रपती भवनापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला. त्यामुळे राष्ट्रपती भवनही हादरून गेलं आहे. आम्हीच हा हल्ला घडवून आणला आहे, असा दावा यूक्रेनच्या सेक्युरिटी सर्व्हिसने केला आहे.
रिपोर्टनुसार, इगोर किरिलोव हे त्यांच्या अपार्टमेंटमधून बाहेर पडत होते. तेव्हाच पार्कात पार्क करण्यात आलेल्या एका स्कूटरमध्ये मोठा ब्लास्ट झाला. या ब्लास्टमध्ये इगोर किरिलोव यांच्यासोबतच त्यांच्या असिस्टंटचाही मृत्यू झाला आहे. हा स्फोट राष्ट्रपती भवनापासून अवघ्या सात किलोमीटरच्या अंतरावर झाला आहे. हा स्फोट घडवून आणण्यासाठी 300 ग्रॅम टीएनटीचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. इगोर यांच्या घराचा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज खंगाळण्यात येत आहेत.
ही स्कूटर येण्यापूर्वी आणि नंतरची परिस्थिती जाणून घेतली जात आहे. स्कूटर पार्क करणारे कोण होते? की कुणी ब्लास्टचं साहित्य या परिसरात आणून ठेवलं याची तपासणी केली जात आहे. याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ब्रिटनने इगोर यांच्यावर बंदी घातली होती. त्यांच्यावर यूक्रेनमध्ये रासायनिश शस्त्रास्त्राची निगराणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
या स्फोटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातून स्फोटाची दाहकता दिसून येते. स्फोट झाल्यानंतर इमारतीच्या बाहेर ढिगारा दिसत आहे. बाजूला रक्ताचे सडे पडले आहेत. तिथेच दोन मृतदेह पडलेले दिसत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण परिसराची घेराबंदी केली आहे. संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.
हा स्फोट एवढा भीषण होता की इमारतीचा काही भाग डॅमेज झाला आहे. इगोर यांच्या मृत्यूनंतर रशियाच्या संसदेच्या उपाध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा सूनियोजित कट होता. आम्ही त्यांच्या हत्येचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
दरम्यान, इगोर हे एक युद्ध गुन्हेगार होते. त्यांच्यावर यूक्रेनला टार्गेट केल्याचा आरोप होता. त्यांनी यूक्रेनच्या सैन्यावर बंदी घातलेले केमिकल्स वापरण्याचे आदेश दिले होते. त्यांच्यामुळे यूक्रेनमध्ये मोठी जिवीत हानी झाली होती. अखेर त्यांचाही मृत्यू झाला आहे.