रूसमध्या कोविडची नवीन लाट आलेली आहे. रूग्णांची आणि कोविडमुळे मृत्यूंच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात रूसमध्ये कोरोनामुळे 44,265 मृत्यू झाले आणि ही संख्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या (World War II) सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक मृत्यूंची संख्या आहे. रूसमध्ये आतापर्यंत एकूण कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची आकडा जवळपास 5 लाख आहे. ब्लूमबर्ग या माध्यामाने ही माहिती प्रकाशीत केली आहे. (Russia covid cases sees highest deaths since world war 2)
कोविडच्या या उद्रेकामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत काम न करण्याचा आदेश दिले आणि सुट्टी जाहीर करावी लागली. अलिकडच्या आठवड्यात रूसमध्ये परिस्थिती आणखी बिघली आहे. या कोविड लाटेत रुग्णालयात बेड्स कमी पडतायेत आणि रुग्णालय ओव्हरलोड झाली आहेत. मॉस्कोसह अनेक प्रदेशांनी कठोर लॉकडाउन जाहीर केले आहेत.
#BREAKING Russia saw 44,000 #COVID19 deaths in Sept, nearly double govt estimate: stats agency pic.twitter.com/GsBm4Wk5wL
— AFP News Agency (@AFP) October 29, 2021
रूसमध्ये कोरोनाव्हायरसच्या एकूण रूग्ण आणि मृत्यूंची संख्या या वरून वाद आहेत. “कोविड-19 विरुद्ध लढण्याचा अधिकार्यांचा दृष्टीकोन बदलला नाही तर कोविडची आजुन एक नवीन लाट येऊ शकेल. ऑक्टोबरमध्ये एकुण जवळपास 100,000 जास्त मृत्यू होण्याची आणि सध्याच्या लाटेत होणारे मृत्यू नोव्हेंबरमध्ये उच्चांक गाठेण्याची शक्यता आहे,” आसं लोकसंख्याशास्त्रज्ञ अॅलेक्सी रक्षा यांनी ब्लूमबर्गला सांगितले.
रूसमध्ये कोविडविरोधी लसीकरणाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी आहे. एकूण 14.6 कोटी लोकसंख्येपैकी आतापर्यंत जवळपास 4.5 कोटी (32 टक्के) पूर्ण लसीकरण झाले आहे. लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे संसर्ग जास्त आहे, आसं म्हटले जात आहे. कोविड -19 ची लस सरकार देशभर पुरवत आहे, पण तरीही लोक त्यातून माघार घेत आहेत.
Related News
Russia Covid Updates: रशियामध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक; एकूण 2.32 लाख मृत्यू, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे काय नवे आदेश? #Russia #RussiaCovidUpdates #Covid19 #coronavirus #VladimirPutin @COVIDNewsByMIB @COVID19Tracking https://t.co/TgyuQkWkfH
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 27, 2021