इराणने ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 2’ लॉन्च करताना इस्रायलवर एकाचवेळी 200 बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. मंगळवारी इराणवर हल्ला होण्याच्या काही तास आधी अमेरिकी अधिकाऱ्यांनी मोठ्या हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. इस्रायलकडे तयारीसाठी फार वेळ नव्हता. असं म्हटलं जातय की, इराणचा हल्ला रोखण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी रशियन राष्ट्रप्रमुख पुतिन यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पुतिन यांनी इराणला हल्ल्यापासून रोखावं अशी नेतन्याहू यांची इच्छा होती. इराणी सुरक्षा सुत्रांनी हा दावा केलाय.
अमेरिकीन अधिकाऱ्यांनी हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर नेतन्याहू यांनी इराणचा हल्ला रोखण्यासाठी राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांना कॉल केला होता. पण पुतिन यांनी नेतन्याहू यांच्याशी बोलण्यास नकार दिला. रशियाला इराणच्या हल्ल्याची आधीच माहिती होती. त्यांनीच इराणला हिरवा कंदील दिला असा दावा करण्यात येतोय. रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन इराणच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.
हल्ला करण्यासाठी इराणने हीच वेळ का निवडली?
रशियन पंतप्रधान तेहरानमध्ये असतानाच इराणने इस्रायलवर हल्ला केला. इराणने विचारपूर्वक सहकाऱ्यांशी चर्चा करुन हल्ल्याचा निर्णय घेतला असं बोललं जातय. हमला हमास चीफ इस्माइल हानिया आणि हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाहच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने हा हल्ला केला. मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात इराणने इस्रायलवर असाच हल्ला केलेला. त्यावेळी त्यांनी अमेरिकेला आधी माहिती दिली होती. पण यावेळी इराणने सगळं मिशन सिक्रेट ठेवलेलं.