नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात युद्धाचा भडका उडाला आहे. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानं 20 हजारांपेक्षा अधिक भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडले होते. वैद्यकीय शिक्षणासाठी हजारो भारतीय विद्यार्थी यूक्रेनला जातात. यापैकी बहुतांश विद्यार्थी युद्ध सुरु झालं तरी यूक्रेनमध्ये अडकले होते. भारतानं युद्ध सुरु झाल्यापासून विद्यार्थी आणि नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु केलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Students) सुरक्षित माघारी आणलं जातंय.यूक्रेनमध्ये रशियाकडून जोरदार हल्ले सुरु आहेत. तर, युक्रेन देखील प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया आणि हंगेरीमधून विमानाद्वारे मायदेशी परत आणलं जातं आहे.
Pakistani & Turkish students used Indian flag to escape Ukraine.
Rana Ayyub ne ki Khoon ki Ultiyan and suffers shock, admitted in Trauma Centre. #UkraineCrisis https://t.co/1tjjTUGkFg pic.twitter.com/0slcYJkyZc— Incognito (@Incognito_qfs) March 2, 2022
यूक्रेनमधील भारतीय दुतावासाकडून विद्यार्थ्यांची यादी करुन त्यांना बसेसमधून युक्रेनच्या सीमांवरुन दुसऱ्या देशात पाठवलं जात आहे. या बसेसवर तिरंगा लावून त्यावर इंडियन पीपल स्टुडंट अशा आशयाचे बोर्ड लावण्यात येत आहेत. आता सोशल मीडिायवर एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा असणं किती महत्त्वाचं आहे, हे सांगितलं आहे. यूक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांसह तुर्की आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना आपली सुरक्षा तिरंगाच करु शकतो असं वाटलं, याविषयाचा एक अनुभव विद्यार्थ्यांनं सांगितला आहे.
युक्रेनमधून सुरक्षित निघण्यासाठी भारतीय विद्यार्थी तिरंगा सोबत ठेवत होते. यासह दुसऱ्या देशांच्या विद्यार्थ्यांनी सुरक्षित राहण्यासाठी तिरंगा झेंडा हाती घेतला. भारत आणि रशियाचे संबंध चांगले असल्यानं भारतीय विद्यार्थ्यांनी रंगाचे स्प्रे आणि कापड आणून तिरंगा झेंडा बनवला. यानंतर सुरक्षित राहण्यासाठी पाकिस्तानी आणि तुर्कीच्या विद्यार्थ्यांनी देखील तिरंगा हाती घेतला.
रशियाने सुरूवातीला युक्रेनमध्ये प्रवेश केल्यानंतर युक्रेनची राजधानी कीव मध्ये असलेल्या लष्करीसाठा नष्ठ करण्याचं काम केलं. त्यानंतर त्यांनी तिथल्या सरकारी कार्यालये नष्ठ करण्याचं काम केलं. हे करीत असताना रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळालं आहे. दुसरीकडे युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे. आता रशिया आणि युक्रेन यांच्यात दुसऱ्या फेरीची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे रशियानं युक्रेनविरोधात भीषण हल्ले सुरुचं ठेवले आहेत.
इतर बातम्या:
Russia Ukraine War Live : यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सूटकेसाठी IMA चं मोदींना पत्र