Russia Ukraine War Live : झेलेन्स्की पळाल्याचा दावा फेटाळला, युद्धाची वेगवान अपडेट

| Updated on: Mar 04, 2022 | 10:57 PM

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Russia Ukraine War Live : झेलेन्स्की पळाल्याचा दावा फेटाळला, युद्धाची वेगवान अपडेट
युद्धाची वेगवान अपडेट
Image Credit source: tv9
Follow us on

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा 9 वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच असून, या युद्धामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान आता रशियन सैनिक युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प झापोरिझ्झिया एनपीपीला लक्ष करत असल्याचे युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमिट्रो कुलेबा यांनी म्हटले आहे. रशियन सैन्य युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पोरिझ्झिया एनपीपीवर चारही बाजुने गोळीबार करत आहेत. आधीच या परिसरात आग भडकली आहे. अशा परिस्थितीमध्ये स्फोट झाला तर तो चेरनोबिलपेक्षा दहा पट मोठा असेल असं युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमिट्रो कुलेबा यांनी म्हटले आहे.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Mar 2022 10:27 PM (IST)

    हरजोत सिंग यांच्या उपचाराचा खर्च भारत सरकार उचलणार : परराष्ट्र मंत्रालय

    युक्रेनमधील कीव येथे अडकलेल्या हरजोत सिंग या जखमी भारतीय विद्यार्थ्यावर बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, हरजोत सिंगच्या उपचाराचा खर्च भारत सरकार उचलणार आहे. आम्ही त्याच्या वैद्यकीय स्थितीबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत. हल्लेखोर भागात असल्यामुळे आम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

  • 04 Mar 2022 08:47 PM (IST)

    झेलेन्स्की पळाल्याचा दावा फेटाळला

    काही वेळापूर्वीच झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडमध्ये पळाल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावा फेटाळला आहे. युक्रेनने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. झेलेन्स्की युक्रेन सोडून कुठेही गेले नाहीत. ते युक्रेनमध्येच आहेत असे सांगण्यात आले आहे.

  • 04 Mar 2022 06:55 PM (IST)

    हल्ल्याचे आणखी व्हिडिओ समोर

  • 04 Mar 2022 05:00 PM (IST)

    गोळी लागलेल्या भारतीय तरूणाचा व्हिडिओ

  • 04 Mar 2022 04:42 PM (IST)

    रशियावर आणखी निर्बंध लादले पाहिजेत – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

    झापोरिझ्झ्या अणु प्रकल्पावरील हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियावर कठोर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे.

  • 04 Mar 2022 02:37 PM (IST)

    आणखी दोन विमानं भारतात येणार

    स्पाइसजेटचे एक विमान 188 विद्यार्थ्यांना घेऊन निघत आहे. भारतीय हवाई दलाचे विमान दुपारी सुमारे 210 विद्यार्थ्यांसह निघेल : स्लोव्हाकियामधील भारताचे राजदूत

  • 04 Mar 2022 01:37 PM (IST)

    युक्रेनच्या खार्किव, सुमी प्रांतात रशियाच्या 130 बस दाखल

    युक्रेनच्या खार्किव आणि सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय तसेच इतर परदेशी नागरिकांना रशियाच्या बेल्गोरोड प्रांतात सुरक्षित हलवण्यात येईल. त्यासाठी रशियाच्या 130 बस युक्रेनमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती रशियन राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल जनरल मिखाईल मिझिंतसेव्ह यांनी दिली.

     

  • 04 Mar 2022 12:36 PM (IST)

    रशियन सैन्याने झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला

    रशियन सैनिकांनी आज युक्रेनमध्ये असलेला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प झापोरिझ्झियाच्या परिसरात तुफान गोळीबार केला होता. त्यानंतर आता रशियन सैनिकांनी झापोरिझ्झिया प्रकल्प ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. रशियन सैनिकांनी अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतल्याचे स्थानिक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

     

  • 04 Mar 2022 11:36 AM (IST)

    युक्रेनशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बैठक

    युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले होते. आता त्यांना भारतात आणले जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ऑपरेशन गंगा नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान युक्रेनमध्ये सध्या काय परिस्थिती आहे. युक्रेनमध्ये आणखी किती भारतीय विद्यार्थी अडकले आहेत? या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली.

  • 04 Mar 2022 10:11 AM (IST)

    अमेरिकेनंतर ब्रिटनकडून देखील रशियावर निर्बंध

    रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज नववा दिवस आहे. आतापर्यंत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध बंद करावे यासाठी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर दबाव आणला जात आहे. मात्र रशिया युद्ध थांबवत नसल्याने अमेरिकेकडून रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अमेरिकेनंतर आता ब्रिटनने देखील रशियावर निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनकडून रशियन उद्योगपतींना व्हिसा नाकारण्यात आला आहे. तर दुसरीकडे फ्रान्स ने देखील युक्रेनला पाठिंबा दिला आहे.

  • 04 Mar 2022 09:51 AM (IST)

    कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार

    गेल्या नऊ दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. अचानक युद्ध सुरू झाल्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी  रशियामध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांना आता भारतात परत आणण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कीवमधून पोलंडच्या बॉर्डवर येत असताना या विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी जखमी झाला आहे.

     

  • 04 Mar 2022 09:38 AM (IST)

    Russia Ukraine War : फ्रान्सचा युक्रेनला पाठिंबा

    युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. रशियाने युक्रेवर केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध थांबवावे  यासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीन राष्ट्रांकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र या दबावाला न जुमानता रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे. या सर्व घडामोडींमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता फ्रान्सने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. फ्रान्स युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करणार आहे.

  • 04 Mar 2022 09:30 AM (IST)

    युक्रेनच्या चेर्निहीव्ह शहरावर रशियाचा मिसाईल हल्ला

    युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा रशियाने युक्रेनच्या चेर्निहीव्ह शहरावर मिसाईल हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्याप्रमाणात इमरतींची पडझर झाली असून, या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे युक्रेनकडून देखील रशियााला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

  • 04 Mar 2022 09:04 AM (IST)

    Video| रशियाच्या सैनिकांकडून युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार

    रशियाच्या सैनिकांकडून युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या झापोरिझ्झियावर गोळीबार करण्यात आला. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या प्रमुख सल्लागारांनी हा गोळीबाराचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

     

  • 04 Mar 2022 08:19 AM (IST)

    झापोरिझ्झियाया परिसरातील आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न

    रशियन सौनिकांनी युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या झापोरिझ्झियाला लक्ष केले आहे. या परिसरात गोळीबार करण्यात आल्याने आग लागली. मात्र या आगीत अणुऊर्जा प्रकल्पाचे कोणतेही नुकसान झाले नसून, सर्व सुरक्षित आहे. आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती युक्रेनच्या वतीने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला देण्यात आली.

  • 04 Mar 2022 07:46 AM (IST)

    युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे संरक्षण राज्यमंत्र्यांकडून स्वागत

    ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये  अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जात आहे. आज प्रत्येकी 210 विद्यार्थ्यांना घेऊन भारतीय हवाई दलाची दोन विमाने दिल्लीत दाखल झाली. यावेळी या विद्यार्थ्यांचे संरक्षण राज्यमंत्री जय भट्ट यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.