रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात परत आणले जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ऑपरेशन गंगा नावाची मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गंत हजारो भारतीय विद्यार्थ्यांना देशात सुखरूपपणे आणले गेले आहे. आतापर्यंत युक्रेनमधून 11 हजार भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आल्यची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. दरम्यान दुसरीकडे रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर दबाव वाढत आहे. मात्र आंतराष्ट्रीय दबाव असताना देखील रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे.