गेल्या दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात घमासान युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान राष्ट्रपती पुतीन (Vladimir Putin) काहीही बोलले नव्हते. मात्र दहा दिवसांनी पुतीन यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. रशियावर निर्बंध लावणे म्हणजे युद्धाची घोषणा केल्यासारखे आहे. युक्रेनला बर्बाद करण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे वक्तव्य आज पुतीन यांनी केले आहे. सैनिकांच्या मुख्य ठिकाणांना पुतीन यांनी टार्गेट करून संपल्याचे यावेळी सांगितलं आहे. आत्तापर्यंत युक्रेनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.