रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा बारावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनमध्ये अचानक युद्ध सुरू झाल्याने हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून भारतात परत आणले जात आहे. त्यासाठी ऑपरेशन गंगा नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहीमेंतर्गंत आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी देखील हंगेरीच्या बुडापेस्टमधून एक विमान 160 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत दाखल झाले. या विद्यार्थ्यी केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान दुसरीकडे युद्ध बंदीसाठी रशियावर अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांकडून दबाव वाढतच आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी लंडनमध्ये सांगितले की, आम्ही लोकशाहीचे रक्षण करत राहू आणि युद्धासाठी पुतीन यांना जबाबदार धरले जाईल याची खात्री बाळगू. आज कॅनडा या अन्यायकारक हल्ल्यात सहभागी असलेल्या 10 लोकांवर नवीन निर्बंध जाहीर करत आहे, असे त्यांनी जाहीर केले.
पोलंडहून परतल्यानंतर केंद्रीय मंत्री व्ही. के सिंग म्हणाले की, आमच्या युक्रेन दूतावासाने हरजोत सिंग यांनाबाहेर काढले आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना उपचारासाठी आरआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आम्ही पोलंडमधून 3,000 हून अधिक भारतीयांना बाहेर काढले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या सल्लागाराने सांगितले की रशिया-युक्रेन यांच्यातील चर्चेची तिसरी फेरी सोमवारी 7.30 वाजता होणार आहे.
विमान वाहतूक मंत्रालयाचे म्हणणे आहे की 400 हून अधिक भारतीयांना परत आणण्यासाठी मंगळवारी दोन नागरी उड्डाणे रोमानियाहून चालविली जातील.
रशिया-युक्रेन शिष्टमंडळाची बैठक 2 तासांपेक्षा कमी कालावधीत सुरू होऊ शकते, असे रशियन मीडियाने वृत्त दिले आहे. रशियन शिष्टमंडळ सध्या बेलारूसमधील ब्रेस्ट येथे पोहोचले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
यूएस सॅटेलाईट इंटेलिजन्सचा दावा आहे की 5 मार्चपर्यंत, रशियन लोकांनी युक्रेनमध्ये उपलब्ध सैन्यांपैकी 90% आधीच तैनात केले आहेत. सध्या 11,000 ठार आणि 30,000 ते 35,000 जखमी झाल्याचा अंदाज आहे, असेही सांगण्यात येत आहे. रशियाचे वास्तविक नुकसान यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते. सेंट्रल कमांडचा अंदाज आहे की रशियाने सुमारे 46,000 सैनिक गमावले आहेत.
NYtimes ने दावा केला आहे की अमेरिका आणि NATO ने कीवला एका आठवड्यात 17,000 पेक्षा जास्त अँटी-टँक शस्त्रे दिली आहेत.
युक्रेनकडे मुबलक प्रमामात शस्त्रसाठा आणि दारूगोळा असल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांकडून करण्यात आला आहे.
#Ukrainian Defense Minister #Reznikov said that there has been significant progress in the supply of weapons and ammunition to the country and promised #Russia a “surprise”. pic.twitter.com/w5aColJIfk
— NEXTA (@nexta_tv) March 7, 2022
रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज बारावा दिवस आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्धात भारताने मध्यस्थी करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यांशी फोनद्वारे चर्चा केली. सुमारे 35 मिनिट चाललेल्या या चर्चेत युक्रेनमध्ये झपाट्याने बदलत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
Prime Minister Modi spoke on phone to President Volodymyr Zelensky of Ukraine.The phone call lasted for about 35 minutes. The two leaders discussed the evolving situation in Ukraine. PM appreciated the continuing direct dialogue between Russia & Ukraine: GoI Sources
(File pics) pic.twitter.com/oCej7bZZzB
— ANI (@ANI) March 7, 2022
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा आज अकरावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युद्ध थांबवण्यासाठी रशियावर अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांकडून दबाव निर्माण केला जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी आज संवाद साधणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Prime Minister Narendra Modi to speak to Russian President Vladimir Putin on the phone today: GoI sources
(file photos) pic.twitter.com/PkqIs0L4EM
— ANI (@ANI) March 7, 2022
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र याचा फटका हा जवळपास जगातील सर्वच देशांना बसत आहे. रशिया हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. रशियावर निर्बंध लादण्यात आल्याने अनेक देशांना होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर आता 130 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत.
रशिया आणि युक्रेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. दोनही देश मागे घेण्यास तयार नाहीत. युक्रेनने शस्त्रे खाली ठेवून आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी रशियाने केली आहे. दरम्यान आज देखील रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. सुरुवातीपासूनच रशियन सैनिक युक्रेनमधील कीव आणि खार्किव ही दोन शहरे टारगेट करत आहेत. रशियन सैनिकांकडून करण्यात आलेल्या मीसाईल हल्ल्यात रशियातील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. प्रचंड प्रमाणात मनुष्य व वित्तहानी झाली आहे. तरी देखील युक्रेन रशियाविरोधात निकराचा लढा देत असल्याचे पहायला मिळत आहे. रशियाविरोधात आता युक्रेनमधील सामान्य माणूस देखील रस्त्यावर उतरला आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा बारावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या खार्किव शहरावर मिसाईल डागले आहेत. या हल्ल्यात शहरातील अनेक रहिवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या युद्धात युक्रेनची मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान गेल्या अकरा दिवसांमध्ये रशियाने अकरा हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या वतीने करण्यात आल आहे.
रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. आतापर्यंत रशियाने युक्रेनवर एकूण 600 मिसाईल हल्ले केल्याचा दावा युक्रेनच्या मीडियाने केला आहे. तसेच रशियाने आपले जवळपास 95 टक्के सैन्य युक्रेनमध्ये तैनात केले आहे.