रशियाकडून (Russia) होणाऱ्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील (Ukraine) संहार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या भीषण युद्धाचा (War) आज 18 वा दिवस आहे. युद्धात होणाऱ्या मनुष्यहानीमुळे रशियावर वेगवेगळ्या देशाने निर्बंध लादले आहेत. रशियाला मदत केल्याबद्दल अमेरिकेकडून चीनवर निर्बंध लादण्याची धमकी देण्यात आली असून त्याचे परिणाम भोगावे लागतील असेही म्हटले आहे. तर अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, रशियन सैन्यांकडून युक्रेनियन लोकांवर होणार्या संभाव्य जैविक किंवा रासायनिक शस्त्रांच्या हल्ल्यासाठी चीन संरक्षण पुरवण्याचा प्रयत्न करत आहे.
युक्रेनमध्ये रशियाद्वारे प्रसारित केल्या जात असलेल्या खोट्या बातम्यांबाबत आणि चीनच्या प्रचाराबाबत अमेरिकेच्या चिंतेमध्ये वाढ होत असल्याने बायडेन आणि शी यांच्या उच्च सल्लागारांमध्ये बैठक होणार आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना एका वरिष्ठ चीनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी रोमला पाठवत आहेत.
व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेविषयी बोलतांना एमिली हॉर्न यांनी सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि चीनचे वरिष्ठ परराष्ट्र धोरण सल्लागार यांग जिएची यांच्यात प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेवर युक्रेन विरुद्ध रशिया आणि आपल्या दोन देशांमधील स्पर्धा कशी व्यवस्थापित करायची यावर चर्चा केली जाणार आहे. युद्धाच्या परिणामावर चर्चा करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात आली आहे. या युक्रेन अमेरिकेच्या पाठिंब्यावर रासायनिक आणि जैविक शस्त्रांची प्रयोगशाळा चालवत असल्याचा खोटा प्रचार रशियाकडून केल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
रशियन सैन्यांकडून युक्रेनियन लोकांवर होणार्या जैविक किंवा रासायनिक शस्त्रांच्या हल्ल्यासाठी चीनकडून संरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. सुलिव्हन यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, जेव्हा रशिया इतर देशांवर जैविक किंवा रासायनिक हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करते तेव्हा त्यांच्याकडूनच ते केले जाण्याची शक्यता आहे. चीनबरोबरच इतर देशांनीही रशियाला मदत करण्याचा प्रयत्न करू नये, त्याचबरोबर अमेरिकेकडून रशियन अर्थव्यवस्थेसाठी बचावात्मक धोरण कधीच अवलंब करणार नाही.
संबंधित बातम्या
Parbhani Accident : परभणीत बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात, 3 जण जागीच ठार