क्यीव: रशियाने युक्रेनवर (Russia-Ukraine War) सुरू केलेला हल्ला अजूनही थांबलेला नाही. काल रात्रभर युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आज सकाळीही जोरदार हल्ले करण्यात आले. आज चौथ्या दिवशी रशियाने युक्रेनवर प्रचंड मोठा मिसाईल हल्ला केला. रशियाने युक्रेनची खारकीव गॅस पाईपलाईन (gas pipeline) उडवून दिली आहे. तसेच वासिली कीव आईल टर्मिनल (Oil Terminal) उडवून दिला आहे. आईल टर्मिनल उडवून देताच सर्वत्र आगीडोंब उसळला आहे. संपूर्ण अवकाशात धुराचे लोट पसरले. सर्वत्र विषारी वायु पसरल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. आगीचे तांडव आणि धुराचे लोट यामुळे अनेकांना श्वसनाचाही त्रास होत आहे. या शिवाय आईट टर्मिनल परिसरात जाण्यापासून अनेकांना मज्जाव करण्यात आला आहे. ऑईल टर्मिनल उडवून दिल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून त्यातून या हल्ल्याची भीषणता आणि दाहकता दिसून येत आहे.
युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयातून एक निवेदन जारी करण्यात आलं असून त्यात या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. रशियन सैन्याने मिसाईल हल्ला केला असून खारकीव येथील गॅस पाईपलाईन आणि ऑईल टर्मिनल उडवून दिलं आहे. जोरदार धमाक्यामुळे एक मशरुम क्लाऊड तयार झालं आहे. त्यामुळे अजून मोठी हानी होऊ शकते. गॅस पाईपलाईन उडवून दिल्याने विषारी वायू पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दारं, खिडक्या लावून घ्याव्यात. कोणीही घराच्याबाहेर पडू नये, असं आवाहन राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
स्टेट सर्व्हिस ऑफ स्पेशल कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन प्रोटेक्शनकडून रशियाच्या हल्ल्यानंतर इशारा देण्यात आला आहे. स्थानिकांनी आपल्या घराच्या खिडक्या, दारे बंद करून ठेवाव्यात. नाकावर ओला कपडा ठेवा म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणार नाही. जेवढं पिता येईल तेवढं पाणी प्या. खाताना शक्यतो लिक्विड पदार्थांचाच समावेश करा, असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.
गॅस पाईपलाईनमधून येणारा विषारी वायू जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे सावध राहा. काळजी घ्या, असा अलर्टही सरकारने दिला आहे. तसेच रशियन सैन्याला खारकीववर ताबा मिळवायचा आहे. त्यामुळे भयंकर लढाई सुरू झाली आहे, असं युक्रेनच्या एक अधिकारी इरीना वेनेडिक्तोवा यांनी सांगितलं.
BREAKING #Vasilkiv oil base
This is ecological catastrophe.#russianinvasion #UkraineWar #UkraineUnderAttac #Ukrainenews pic.twitter.com/Ruflc8Mddd
— KyivPost (@KyivPost) February 26, 2022
संबंधित बातम्या:
Russia Ukraine War Live : हंगेरीमधून तिसरे विमान दिल्लीला रवाना