Russia Ukraine War LIVE : न्यूक्लियर फॅसिलिटी क्षेत्रात रशियाचं सैन्य घुसलं

| Updated on: Feb 25, 2022 | 12:43 AM

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संबंध (Russia Ukraine Crisis) आता अधिकच चिघळू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन देशामध्ये वाद होता. मात्र आता या वादाचे रुपांतर युद्धात झाले आहे. वेगवेगळ्या वृत्तसंस्थांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार रशियानं युक्रेनवर हल्ला केला आहे.

Russia Ukraine War LIVE :  न्यूक्लियर फॅसिलिटी क्षेत्रात रशियाचं सैन्य घुसलं
Russia Ukraine war live updates
Follow us on

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संबंध (Russia Ukraine Crisis) आता अधिकच चिघळू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन देशामध्ये वाद होता. मात्र आता या वादाचे रुपांतर युद्धात झाले आहे. वेगवेगळ्या वृत्तसंस्थांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार रशियानं युक्रेनवर हल्ला केला आहे. शियाचे राष्ट्रपती वाल्मादिर पुतीन (Russian President Vladimir Putin) आक्रमक झाले असून, त्यांनी युक्रेनविरोधात युद्धाला सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान हे युद्ध म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची नांदी असल्याने सध्या संपूर्ण जगाचे लक्ष सध्या या दोन देशांकडे लागले आहे.

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Feb 2022 09:55 PM (IST)

    यूक्रेनच्या जनतेनं जखमी सैनिकांसाठी रक्तदानाच्या रांगा लावल्या

    यूक्रेनच्या जखमी सैनिकांना रक्त पुरवठ्याची गरज

    राष्ट्रपती जेलेंस्की यांचं आवाहन

    लोकांनी रक्तदानााठी रांगा लावल्या

  • 24 Feb 2022 09:31 PM (IST)

    न्यूक्लियर फॅसिलिटी क्षेत्रात रशियाचं सैन्य घुसलं

    रशियानं युक्रेनवर हल्ला केलाय. फायटर जेट द्वारे हल्ला केला जातोय. यामुळं युक्रेनचे नागरिक घाबरले आहेत. राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांनी मार्शल लॉ लावला आहे. नागरिकांनी घाबरू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र, दुसरीकडे न्यूक्लिअर फॅसिलिटीमध्ये रशियन सैन्य घुसलेय. यूक्रेनचं सैन्य कीव जवळील एअरबेस वाचवण्यासाठी लढतंय.

  • 24 Feb 2022 08:12 PM (IST)

    यूक्रेनचं लढाऊ विमान क्रॅश, 14 जण करत होते प्रवास

    यूक्रेनची राजधानी किव जवळ एक लढाऊ विमान क्रॅश झालं आहे. त्या विमानातून 14 जण प्रवास करत होते, अशी माहिती आहे.

  • 24 Feb 2022 07:31 PM (IST)

    रशियाचे यूक्रेनवर 203 हल्ले

    रशियानं आतापर्यंत यूक्रेनवर 203 विमान हल्ले केले आहेत. यूक्रेनची समी बॉर्डर गार्ड कमिटीनं रशियाचं सैन्य क्रिमियातून सीमा पार करत असल्याचं दिसून आलं होतं.

  • 24 Feb 2022 07:07 PM (IST)

    यूक्रेनच्या किव शहरात युद्धाचा लाल सायरन वाजला

    रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर युद्धाचा लाल सायरन वाजवण्यात आला

    युक्रेनच्या किव शहरात वाजवण्यात आला सायरन

    नागरिकांना सुरक्षित जागी स्वत:ला ठेवण्याचं आवाहन

    कुणीही घराबाहेर न पडण्याचं नागरिकांना आवाहन

    सुरक्षा यंत्रणांना सहकार्याचं आवाहन

  • 24 Feb 2022 06:52 PM (IST)

    युक्रेनच्या कीव या शहरजवळ रशियाचा हल्ला

    युक्रेनच्या कीव या शहरजवळ रशियाचा हल्ला
    युक्रीया शहरावर रशियाकडून बाँम्ब हल्ला
    नागरिकांमध्ये दहशत
  • 24 Feb 2022 06:21 PM (IST)

    रशियाचं सैन्य पॅराशूटमधून यूक्रेनमध्ये

    रशियाचं सैन्य पॅराशूटमधून यूक्रेनमध्ये

  • 24 Feb 2022 06:04 PM (IST)

    भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न, आम्हाला शांतता हवीय : राजनाथ सिंह

    यूक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तिथं विमानं उतरण्याची स्थिती नाही.
    भारताला शांती हवी आहे. युद्धाची स्थिती नको ही भारताची भूमिका आहे. आपण काही विद्यार्थ्यांना माघारी आणलेलं आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

  • 24 Feb 2022 06:04 PM (IST)

    रशियानं यूक्रेन विरोधात लढाईची कशी तयारी केलीय, पाहा फोटो

    रशियानं यूक्रेन विरोधात लढाईची कशी तयारी केलीय हे रडारनं यूक्रेन परिसरातील घेतलेल्या फोटोवरुन दिसून येत आहे. रशियन माध्यमानं यांसदर्भात फोटो ट्विट केला आहे.

  • 24 Feb 2022 05:20 PM (IST)

    Russia Ukraine : यूक्रेनच्या ओडेस्सामध्ये 18 जणांचा मृत्यू

    रशियाला उत्तर देण्यासाठी नाटोकडून तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, रशियाकडून युक्रेनच्या ओडेस्सामध्ये झालेल्या हल्ल्यात 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एफएपी प्रेसनं दिली आहे.

  • 24 Feb 2022 05:08 PM (IST)

    नरेंद्र मोदी यांनी बोलावली उच्च स्तरीय बैठक

    रशिया आणि यूक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्याकडून उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर भारताची भूमिका काय असावी, यावर बैठक घेण्यात येणार आहे. भारताचे 18 हजार नागरिक यूक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत कसं आणायचं. याबाबत नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्र्यांसंह अजित डोभाल यांच्यात चर्चा होणार आहे. रशिया कायम भारताचा मित्र राहिलेला आहे. त्यामुळं भारताची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

  • 24 Feb 2022 04:25 PM (IST)

    यूक्रेनच्या सर्व नागरिकांना शस्त्र देणार : राष्ट्रपती जेलेंस्की

    देशातील जे लोक रशियापासून देशाचं संरक्षण करण्यास इच्छूक असतील त्यांना शस्त्र दिली जातील. त्या नागरिकांवरील प्रतिबंध हटवले जातील. जनतेनं देशाच्या संरक्षणासाठी तयार राहावं, असं म्हटलं गेलंय.

  • 24 Feb 2022 04:12 PM (IST)

    यूक्रेनच्या सैनिकाचा व्हिडीओ व्हायरल

    यूक्रेनच्या सैनिकाचा व्हिडीओ व्हायरल

  • 24 Feb 2022 04:09 PM (IST)

    यूक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर सोने आणि क्रुड आईलचे दर भडकले

    यूक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर सोने आणि क्रुड आईलचे दर भडकले

  • 24 Feb 2022 03:49 PM (IST)

    रशियानं यूक्रेनवर बॅलेस्टिक मिसाईल डागल्या 

    रशियानं यूक्रेनवर बॅलेस्टिक मिसाईल डागल्या

    यूक्रेन विरोधात रशिया आक्रमक

    रशियाचं यूक्रेनच्या सैन्याला शस्त्र टाकण्याचं आवाहन

  • 24 Feb 2022 02:59 PM (IST)

    नाटोनं बोलावली आपत्कालीन बैठक

    बाल्टिक देश आणि पोलंड या देशांच्या सीमा रशिया लगत आहेत. रशियानं यूक्रेनवर हल्ला केलाय. त्या पार्श्वभूमीवर नाटोनं सदस्य देशांची तातडीची बैठक बोलावली आहे.

  • 24 Feb 2022 02:52 PM (IST)

    रशियाच्या 50 सैनिकांचा मृत्यू, 6 लढाऊ विमानं पाडली, यूक्रेनचा दावा

    रशियाच्या 50 सैनिकांचा मृत्यू, 6 लढाऊ विमानं पाडली, यूक्रेनचा दावा

  • 24 Feb 2022 02:49 PM (IST)

    केरळच्या मुख्यमंत्र्यांचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र

    केरळच्या मुख्यमंत्र्यांचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र

  • 24 Feb 2022 02:24 PM (IST)

    जागतिक नेत्यांनी युद्धसामग्री द्यावी यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची विनंती

    जागतिक नेत्यांनी युद्धसामग्री द्यावी यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची विनंती

  • 24 Feb 2022 02:11 PM (IST)

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत बोलताना युरोपियन कमिशनचे अध्यक्ष, उर्सुला वॉन डेर लेयन यांनी असे म्हटले आहे की, निर्बंधांमुळे रशियाला आर्थिक स्थरावर मोठा फटका बसू शकतो.

  • 24 Feb 2022 02:00 PM (IST)

    पुतीन यांच्या घोषणेनंतर रशियन सैन्याचा युक्रेनवर हल्ला

    रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाई करण्याचे आदेश देताच रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती  रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे. रशियाने युक्रेनमधील विमानतळावर देखील गोळीबार केला आहे.

     

  • 24 Feb 2022 01:41 PM (IST)

    रशियाच्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू, नऊ जखमी

    रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रशियाने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.

     

  • 24 Feb 2022 01:21 PM (IST)

    नागरिकांची एटीएमबाहेर गर्दी

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक जण शहर सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. नागरिकांनी पौशांसाठी एटीएमबाहेर गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे.

  • 24 Feb 2022 01:12 PM (IST)

    युक्रेनमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    रशियाने युक्रेनवर हल्ला केलाय. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या अनेक शहरात भीतीचे वातावर असून, नागरिक शहरातून बाहेर पडत आहेत. युक्रेनच्या नागरिकांकडून स्थलांतरणासाठी सुरक्षीत जागेचा शोध घेतला जात आहे.

  • 24 Feb 2022 01:02 PM (IST)

    इमरान खान यांचा रशियात गार्ड ऑफ ऑनरने सन्मान

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या रशिया दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. इमरान खान यांचे मास्को विमानतळावर आगमन होताच रशियाच्या वतीने त्यांच्यासाठी रेड कार्पेट अथंरण्यात आले. तसेच त्यांचा गार्ड ऑफ ऑनरन देऊन सन्मान करण्यात आला.

     

  • 24 Feb 2022 12:47 PM (IST)

    युक्रेनमधील भारतीय नागरिकांना सुरक्षीत स्थळी जाण्याचे भारतीय दूतावासाकडून आवाहन

    रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीवर हल्ला करण्यात आला. दरम्यान या पार्श्वभूमीवर कीवमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतर करण्याचा सल्ला युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून देण्यात आला आहे. नव्या गाईडलाईन्स देखील जारी करण्यात आला आहे.

  • 24 Feb 2022 12:41 PM (IST)

    रशियाकडून हल्ले सुरूच

    रशिया – युक्रेन युध्दात रशियाकडून हल्ले सुरूचं

    युक्रेनच्या पोलटावा भागात रशियाकडून बाँम्ब हल्ले

    मिरागोरोड शहरात सुरू आहेत हल्ले

  • 24 Feb 2022 12:38 PM (IST)

    एअर इंडियाचे विमान युक्रेनची राजधानी कीववरून दिल्लीत परतले 

    एअर इंडियाचे विमान युक्रेनची राजधानी कीववरून दिल्लीत परतले

     

  • 24 Feb 2022 12:32 PM (IST)

    जर्मन नागरिक युक्रेनच्या समर्थनार्थ रस्त्यावर

    रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या ह्ल्ल्याचा आतापर्यंत अनेक देशांनी निषेध केला असून, जर्मनीचे नागरिक युक्रेनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत, त्यांनी रस्त्यावर उतरत युक्रेनचा झेंडा फडकवला आहे.

  • 24 Feb 2022 12:19 PM (IST)

    बदला घेऊ! इंग्लंडचा रशियाला इशारा, मित्र राष्ट्र एकवटले

    इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाचा तीव्र शद्बात निषेध केला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे माझी चिंता वाढली आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले असून, याबाबत मी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर विनाकारण हल्ला करून रक्तपात आणि विनाशाचा मार्ग निवडला आहे. इंग्लंड आणि आमचे मित्र देश या हल्ल्याला प्रत्युत्तर देतील असे जॉन्सन यांनी म्हटले आहे.

  • 24 Feb 2022 12:18 PM (IST)

    अमरावतीमध्ये भाजप नेते अनिल बोंडें आणि पोलिस यांच्यात बाचाबाची

    महिला पोलीस अधिकारी आणि भाजप नेते अनिल बोंडें यांच्यात बाचाबाची….

    आंदोलकाना ताब्यात घेण्यावरून झाली पोलीस आणि बोंडें यांच्यात बाचाबाची…

    नवाब मलिक यांच्या राजीनाम्या वरून सुरू होते आंदोलन..

    पोलीस की दादागिरी नही चलेगी,भाजपच्या घोषणा

  • 24 Feb 2022 12:15 PM (IST)

    वसईत भाजपाने निदर्शने केली

    नवाब मालिकांचा तात्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी वसईत भाजपाने निदर्शन केली आहेत..

    भाजपाचे वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली वसई च्या तहसिल कार्यालया समोर आज सकाळी साडे अकरा वाजता ही निदर्शन करण्यात आली आहेत.

    महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्र्याचे दहशतवादी सोबत संबंध असल्याचे उघड होऊन मणीलॅन्डरी प्रकरणात त्यांना अटक होते , ही घटना देशासाठी घातक असल्याचा आरोप ही भाजपा पदाधिकारी यांनी केला आहे.

    नवाब मलिक आपल्या कॅबिनेट पदाचा राजीनामा देणार नसतील तर मुख्यमंत्री यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

  • 24 Feb 2022 12:08 PM (IST)

    NATO चा रशियाला गंभीर इशारा 30 सदस्य देश करणार हल्ला

    रशियाने युक्रेनवर आज हल्ला केला आहे. या हल्ल्याचा अनेक देशांकडून निषेध करण्यात आला आहे. दरम्यान आता या पार्श्वभूमीवर नाटोने रशियाला गंभीर इशारा दिला आहे. नाटोमध्ये सहभागी असलेले 30 देश रशियावर हल्ला करण्याचा तयारीत आहेत. आम्ही रशियाच्या विरोधात आर्टिकल 4 चा उपयोग करणार असल्याचे NATO ने म्हटले आहे.

  • 24 Feb 2022 12:02 PM (IST)

    पुतीन यांचा रशियन प्रसारमाध्यमांशी संवाद

    युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी रशियन वृत्तवाहिनीशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही युक्रेनमध्ये विशेष लष्करी ऑपरेशन सुरू केले आहे. आमचा युक्रेनवर कब्जा करण्याचा उद्देश नाही. मात्र युक्रेनच्या सैन्याने शस्रे खाली टाकावेत अशी आमची मागणी आहे. अन्यथा युक्रेनमध्ये जे नुकसान होईल त्याला तेच जाबाबदार असतील

  • 24 Feb 2022 11:47 AM (IST)

    रशियाचे पाच फायटर जेट उडवल्याचा युक्रेनचा दावा

    रशिया आणि युक्रेनमध्ये अखेर युद्धाची थिनगी पडली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे रशियाचे 5 फायटर जेट उडवल्याचा दावा युक्रेने केला आहे.