Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनसोबत अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या युद्धाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुतीन यांनी युद्धविरामाची तयारी दर्शवली आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष थांबावा यासाठी प्रयत्न करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लूला दा सिल्वा यांच्यासह जगभरातील नेत्यांचे आभार मानले आहे. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्जेंडर लुकाशेंको यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत पुतिन म्हणाले, आम्ही युद्ध थांबवण्याचा प्रस्तावाचे समर्थन करत आहोत. परंतु आमचा आणखी एक विचार आहे. दोन्ही देशांमधील प्रश्नाचा कायमस्वरुपी तोडगा काढून युद्धबंदी केली जावी. संकटाचे मूळ कारणच शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे, असे पुतिन यांनी म्हटले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले की, यूक्रेनच्या निर्णयावर इतके लक्ष ठेवणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच बाझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांचे आभार व्यक्त करतो. कारण त्यांचा उद्देश एक मोठ्या मिशनीची प्राप्ती आहे. ज्यामुळे संपत्तीचे होणारे नुकसान आणि जीवीत हानी टाळता येईल.
पुतीन म्हणाले, युक्रेनशी शत्रुत्व थांबवण्यासाठी आम्ही युद्धविरामाच्या प्रस्तावाशी सहमत आहोत. परंतु आम्ही या वस्तुस्थितीपासून पुढे जात युद्धविरामाचे रुपांतर कायम स्वरुपी शांतता निर्माण करण्यात झाले पाहिजे. त्यासाठी या संकटाची मूळ कारणे शोधली पाहिजे. ट्रम्प यांनी ३० दिवसांचा युद्धविरामाचा प्रस्ताव आणला होता.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी असे काही म्हटले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युद्ध थांबवायचे नाही. परंतु ते थेट डोनाल्ड ट्रम्प यांना सांगण्यास घाबरतात. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतीन यांच्या प्रस्तावित युद्धबंदीबाबतच्या अस्पष्ट भूमिकेवरही टीका केली. झेलेन्स्की यांनी पुतिनच्या यूएस-प्रस्तावित 30 दिवसांच्या युद्धविरामावर नाराजी व्यक्त केली. पुतिन यांनी युद्धबंदीचे समर्थन तर केलेच पण चिंताही व्यक्त केल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले.