Russia-Ukraine War: रशियात नोटाबंदी सारखी स्थिती, एटीएम, बँका बंद; पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

| Updated on: Mar 02, 2022 | 3:34 PM

रशियाने युक्रेनवर (Russia-Ukraine War) हल्ला केल्याने युक्रेनचं जनजीवन अस्तव्यस्त झालं आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झालं असून हजारो नागरिक जीव वाचवण्यासाठी इतर देशांचा आसरा घेत आहेत.

Russia-Ukraine War: रशियात नोटाबंदी सारखी स्थिती, एटीएम, बँका बंद; पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
रशियात नोटाबंदी सारखी स्थिती, एटीएम, बँका बंद; पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
Follow us on

मॉस्को: रशियाने युक्रेनवर (Russia-Ukraine War) हल्ला केल्याने युक्रेनचं जनजीवन अस्तव्यस्त झालं आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झालं असून हजारो नागरिक जीव वाचवण्यासाठी इतर देशांचा आसरा घेत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा केवळ युक्रेनलाच फटका बसलेला नाहीये. तर रशियालाही (Russia) त्याचा फटका बसला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन (Vladimir Vladimirovich Putin) यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे तर रशियात नोटाबंदीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. पुतीन यांच्या निर्णयामुळे बँका बंद आहेत. एटीएममध्ये पैशांचा खळखळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरू असलेल्या प्रत्येक एटीएमबाहेर रांगा लावल्या आहेत. पैसे काढण्यासाठी रशियन नागरिक तास न् तास रांगेत उभे आहेत. तसेच रांगेत उभे असलेले हे नागरिक सरकार विरोधातील आपला संतापही व्यक्त करताना दिसत आहेत.

युक्रेनवरील हल्ल्याचा आज सातवा दिवस आहे. युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये जोरदार हल्ले करण्यात आल्याने अनेक ठिकाणी हाहाकार उडाला आहे. दुसरीकडे रशियातही या युद्धाचे परिणाम जाणवू लागले आहेत. राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचा फटका तिथल्या नागरिकांना बसला आहे. रशियाच्या या अडेल तट्टू धोरणामुळेच अमेरिकेसहीत अनेक देशांनी रशियावर कठोर प्रतिबंध लावले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत रशियाच्या रुबलमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

श्रीमंतही एटीएमच्या रांगेत

रशियात श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांना रोकडची चणचण भासत आहे. युद्धामुळे आणि इतर देशांनी आर्थिक निर्बंध लादल्याने रशियातील बँकिंग सिस्टिमवर मोठा परिणाम झाला आहे. या शिवाय अन्नधान्याच्या किंमतीतही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रशियन नागरिक प्रचंड त्रस्त झाला आहे.

अमेरिकेचा इशारा

रशियाच्या रुबलमध्ये मोठी घसरण झाल्याने त्याचा सामान्य लोकांवर परिणाम झाला आहे. हताश नागरिक पैसे काढण्यासाठी एटीएमच्याबाहेर रांगेत उभे असलेले दिसत आहेत. अमेरिकेने पाश्चात्य देशातील रशियाच्या केंद्रीय बँकांच्या संपत्तीवरही टाच आणली आहे. रशियाला वैश्विक बँकिंग सिस्टिम स्विफ्ट प्रणालीतूनही काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रशियाला रोज अप्रत्यक्षरित्या मोठं नुकसान सोसावं लागत आहे. रशियाच्या डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडला पूर्णपणे थांबवलं जाईल त्यामुळे रशियाला 630 अब्ज अमेरिकन डॉलरचं नुकसान होणार आहे. रशियाला हे नुकसान अत्यंत महागात पडू शकतं.

संबंधित बातम्या:

Russia Ukraine War Video: मेड बाय रशिया, आगीच्या ज्वाळा, धगधगणाऱ्या इमारती, यूक्रेनचा कणा मोडतोय?

Russia Ukraine War Video: तू चाल गड्या तुला रं भीती कशाची? जेव्हा यूक्रेनच्या लोकांनी रशियन रणगाडे अडवले

Fact Check Video : सैरावैरा धावणारी 11 वर्षाची मुलगी जागेवर खाडकन् कोसळली, ‘तो’ व्हिडिओ नेमका कुठला?