नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेन (Russia and Ukraine) यांच्यातील युद्धासंबंधी आणखी एक घडामोड समोर येत आहे. रशियाकडून युक्रेनवर लष्करी आक्रमण करण्यात आल्यापासून पहिल्यांदा युक्रेनियन सैन्याला सत्ता स्थापित करण्याचं आवाहन करण्यात आलं. नाटो सदस्य देशात यूक्रेननं सहभागी होऊ नये ही भूमिका रशियाची होती. तर, दुसरी भूमिका ही यूक्रेनचे सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांना त्यांच्या पदावरुन पायउतार करण्यात यावं ही आहे. या दोन भूमिका घेऊन रशिया युक्रेनवर हल्ले करत आहे. वोलोदिमीर झेलेन्स्की (volodymyr zelensky) यांच्या जागी यानुकोव्हिच (Viktor Yanukovych) यांना राष्ट्रपती करावं, अशी भूमिका रशियाची असल्याचं समोर आलं आहे. यानुकोव्हिच हे यापूर्वी युक्रेनचे अध्यक्ष होते. यानुकोव्हिच हे रशियाधार्जिणे आहेत. तर, वोलेदिमीर झेलेन्स्की हे यूरोपियन देशांच्या बाजूनं झुकलेले आहेत. त्यामुळं एकेकाळी देश सोडून पळून जाणाऱ्या यानुकोव्हिच यांना रशियाला युक्रेनचं अध्यक्ष बनवायचं आहे.
Yanukovych is in Minsk. Kremlin wants to make him the President of #Ukraine. – By Ukrainian Truth pic.twitter.com/41iCgJq225
— KyivPost (@KyivPost) March 2, 2022
विक्टर यानुकोव्हिच यांना रशियाकडून युक्रेनचे नवीन राष्ट्रपती म्हणून जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. यानुकोव्हिच यांनी 2010 ते 2014 या कालावधीत युक्रेनचे राष्ट्रपती म्हणून काम केलं आहे. 2014 मध्ये यूक्रेनमध्ये क्रांती झाली आणि विक्टर यानुकोव्हिच यांना देश सोडून पळून जावं लागलं होतं. त्यापूर्वी 2006 ते 2007 मध्ये युक्रेनचं पंतप्रधान म्हणून देखील काम केलं आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये 2013 मध्ये वादाला सुरुवात झाली. विक्टर यानुकोव्हिच यांच्या विरोधात युक्रेनमध्ये आंदोलन सुरु झालं होतं. ते आंदोलन यानुकोव्हिच यांच्या विरोधात होतं. त्याला अमेरिका आणि यूरोपियन देशांनी पाठिंबा दिला होता. रशियानं यानुकोव्हिच यांना पाठिंबा दिलेला होता. मात्र, युक्रेनच्या जनतेच्या आंदोलनामुळं विक्टर यानुकोव्हिच यांना देश सोडून पळून जावं लागलं होतं.
युक्रेनचे सध्याचे राष्ट्रपती वोलेदेमीर झेलेन्स्की हे युरोपियन आणि अमेरिकन देशांच्या बाजूनं भूमिका घेणारे आहेत. नुकतेच यूक्रेनला युरोपियन यूनियनमध्ये सभासद करुन घेण्यात आलं आहे. आता रशिया व्लादिमीर पुतिन यांच्या जवळचे असलेले विक्टर यानुकोव्हिच यांना युक्रेनचे राष्ट्रपती म्हणून जाहीर करु शकते.
Breaking News: तिसरं महायुद्ध हे अणूयुद्ध असेल, पुतिनचे इरादे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याकडून जाहीर
Video: तिरंगा आहे तर सुरक्षा आहे, यूक्रेनमध्ये जेव्हा तुर्की, पाकिस्तान्यांनाही तिरंग्यानं वाचवलं !