Russia vs America : रशियाने काल ब्लॅक सी मध्ये अमेरिकेच शक्तीशाली MQ-9 रिपर ड्रोन पाडलं. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण अमेरिकेच्या मनात एक वेगळीच भिती आहे. त्यामुळे अमेरिका फुल टेन्शनमध्ये आहे. अमेरिकेच हे ड्रोन खोल समुद्रात विसावलं आहे. या ड्रोनचा ढिगारा ही अमेरिकेसाठी चिंतेची बाब आहे. तुम्ही म्हणाल ड्रोनचा ढिगारा अमेरिकेसाठी इतका का महत्त्वाचा आहे? त्यासाठी अमेरिकेचा जीव का तुटतोय? खरंतर रशियाने अमेरिकेच्या प्रतिष्ठेवर वार केला आहे.
प्रतिष्ठेपेक्षापण अमेरिकेला ड्रोनच्या ढिगाऱ्याची इतकी चिंता का? त्यात असं काय आहे की, भविष्यात अमेरिकेला मोठा झटका बसू शकतो.
अमेरिकेचं टेन्शन समजलं
अमेरिकेच्या MQ-9 रिपर ड्रोनच्या ढिगाऱ्यात टेक्निक दडली आहे, ज्याद्वारे अमेरिका आपले गोपनीय मिशन्स प्रत्यक्षात आणते. त्यामुळे काहीही झालं, तरी हा ढिगारा रशियाच्या हाती लागू नये, हाच अमेरिकेचा प्रयत्न असेल. कारण हा ढिगारा रशियाच्या हाती लागल्यास त्यांना अमेरिकन ड्रोन्सची टेक्निक समजेल. ज्याचा भविष्यातील मोहिमांमध्ये अमेरिकेला फटका बसू शकतो, शिवाय अमेरिकेन ड्रोन्सच्या बाजारपेठेला तगडा झटका बसेल.
रशिया काय करु शकतं?
रशिया सुद्धा अमेरिकेच्या तोडीची शस्त्रास्त्र बनवते. शस्त्रास्त्रांच्या जागतिक बाजारपेठांमध्ये या दोन देशांच वर्चस्व आहे. अमेरिका आणि रशिया दोघेही जगातील बुहतांश देशांना शस्त्रास्त्र विकतात. जग या दोन महासत्तांमध्ये विभागल गेलं आहे. त्यामुळे MQ-9 रिपर ड्रोनची टेक्निक रशियाच्या हाती पडू नये, यासाठी सर्वकाही करेल.
अमेरिकन अधिकाऱ्याने काय म्हटलय?
ब्लॅक सी चा समुद्र आपल्या प्रभाव क्षेत्रात येतो, असं रशियाचा दावा आहे. त्यामुळे या ड्रोनचा ढिगारा बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न करु असे संकेत रशियाने दिले आहेत. या ड्रोनची टेक्निक आणि गोपनीय माहिती चुकीच्या हातात पडू नये, त्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असं अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलय.