मॉस्को- रशियाचे राष्ट्राध्यक्ष (Russia President) व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)लवकरच बाप होणार आहेत. त्यांची माजी जिमनास्ट गर्लफ्रेंड अलीन काबेवा गर्भवती (pregnant)असून, त्यांना मुलगी होण्याची आशा आहे. ६९ वर्षांचे असलेले रशियन राष्ट्राध्यक्ष यांच्यापासून अलीना काबेवा यांना आधीच दोन मुले आहेत. यावेळी एका मुलीच्या जन्माची अपेक्षा हे दाम्पत्य करीत आहे. पुतीन यांची गर्लफ्रेंड असलेल्या अलीना या माजी जिमनास्ट आहेत. पुतिन यांच्या तिसऱ्या मुलाला त्या जन्म देणार आहेत. मात्र या बातमीने पुतिन यांना फारसा आनंद झालेला नसल्याची माहिती एका स्थानिक वेबसाईटने दिली आहे. आपल्याला भरपूर मुले आणि काही काळांपूर्वीही मुलीही आहेत, अशी पुतिन यांची यासंदर्भातील भूमिका असल्याचे सांगण्यात येते आहे. ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट जिमनास्ट अलीना आणि पुतीन यांच्या प्रेम प्रकरणाबाबतच्या अफवा नेहमीच चर्चेत असतात. या गुप्त रिलेशनशिपबाबत अलीना या रशियात बऱ्याच प्रसिद्धही आहेत.
पुतिन हे अत्यंत गुप्त आणि गूढ जीवन जगतात, असे सांगण्यात येते. त्यंनी कधीही सार्वजनिक ठिकाणी आपल्याला किती मुले आहेत हेही सांगितलेले नाही. पुतिन यांची घटस्फोटीत पत्नी ल्यूडमिला ओचेरेत्नाया यांना पुतिनपासून दोन मुली झाल्या होत्या. त्या दोघीही नावाजलेल्या आहेत. बिझनेसवूमन मारिया वोरोत्सोवा आणि कैटरिना तीखीनोवा या दोघीही हाय प्रोफाईल म्हणून परिचित आहेत.
जिमनास्ट म्हणून खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर अलीना राजकारणात दाखल झाल्या. पुतिन यांच्या युनायडेट रशिया पार्टीच्या त्या खासदारही झाल्या. पुतिन यांचीगर्लफ्रेंड असलेल्या अलीना यांनी एका मॅगझिनसाठी त्यांचा सेमी न्यूड फोटो काढला होता. अलीना यांनी गायक होण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. २००७ ते २०१४ या काळात अलीना या रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच डेप्युटी स्टेट ड्युमा या पदावर राहिलेल्या आहेत. याचबबोरबर २०१४ साली त्यांची रशियाच्या नॅशनल मीडिया ग्रुपच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्तीही करण्यात आली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांचाही मोठा परिवार आहे. ट्रम्प यांनी तीन लग्ने केली आणि त्यांना पाच मुले आहेत. त्यांच्या मुलांनाही आता मुले झाली आहेत. ट्रम्प यांचा परिवार हा अमेरिकेतील सर्वात मोठा व्यावसायिक परिवार मानण्यात येतो. ट्रम्प आणि त्यांची मुले ही उद्योजक आहेत. ट्रम्प यांचीसंस्था जगभरातील त्यांच्या अनेक कारभारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.