रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर, एके-203 रायफल्स, डिफेन्स सिस्टीमचा सौदा अजेंड्यावर

| Updated on: Dec 06, 2021 | 8:37 AM

कुठल्याही क्षमतेचे मिसाईल हाणून पाडण्याची क्षमता ह्या डिफेन्स सिस्टीममध्ये आहे. ही सिस्टीम एवढी मजबूत मानली जातेय की त्यावर अमेरीकेनं आक्षेप घेतलाय. काही निर्बंध लादण्याचीही अप्रत्यक्ष घोषणा केलीय पण भारतानं असे कुठलेही इशारे सहन करणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर, एके-203 रायफल्स, डिफेन्स सिस्टीमचा सौदा अजेंड्यावर
रशियाचे अध्यक्ष पुतीन हे आजपासून दोन दिवसाच्या दौऱ्यावर
Follow us on

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) आजपासून भारताच्या दोन दिवसीय (Putin On India Tour) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भारत आणि रशिया यांच्या दरम्यान काही डिफेन्स डिलवर (India Russia Defense deal) स्वाक्षऱ्या होणार आहेत. तसच भारत चीन यांचे सध्याचे ताणलेले संबंध, भारत-पाक संबंध, अफगाणिस्तानमधली नाजूक स्थिती, त्यातला भारत-रशियाचा रोल ह्या सगळ्यांवर चर्चा अपेक्षीत आहे. अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांची शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होईल. तसच वन टू वनही चर्चा अपेक्षीत आहे. 2019 मध्ये ब्रासिलियामध्ये मोदी आणि पुतीन (Modi Putin Meet Today) यांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांच्या भेटीची आणि चर्चेची ही पहिलीच वेळ आहे.

नेमकी काय डील होणार?
भारत-रशिया यांच्यातलं हे 21 वा शिखर संमेलन आहे (21st India Russian annual Meet). दोन्ही देशांचं शिष्टमंडळ चर्चेत भाग घेईल. भारताच्यावतीनं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसच संरक्षण मंत्री राजनाथसिंग हे भाग घेतील तर रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव प्रतिनिधीत्व करतील. दोन्ही देशात चीन-पाकिस्तान-अफगाणिस्तानसह विविधी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा होणार आहे. पण चर्चेचं मुख्य आकर्षण आहे ती दोन्ही देशात होऊ घातलेली डिफेन्स डील.

एके-203 रायफल्सची डील
रशियानं एके-203 असॉल्ट रायफलची (AK-203 assault rifles ) निर्मिती केलेली आहे. संरक्षण करण्यासाठी ही एक अत्याधुनिक हत्यार मानलं जातं. पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात याच रायफल्सची डील होणार आहे. विशेष म्हणजे ह्या रायफल्सची निर्मिती उत्तर प्रदेशातल्या अमेठीत होणार आहे तीही मेक इन इंडियाच्या मिशन अंतर्गत. आजची डील झाल्यानंतर पुढच्या दहा वर्षासाठी भारतीय सशस्त्र दलांसाठी AK-203S मॉडेलची 6,014,427 रायफल्स निर्मिती केली जाईल. यातले पहिल्या 70 हजार रायफल्स ह्या रशियातच तयार केल्या जातील. ती कशी बनते, काय काय खबरदारी घ्यायची असते, म्हणजेच निर्मितीच्या सगळ्या अटी पूर्ण केल्यानंतर तिचं भारतात उत्पादन सुरु होईल. त्यासाठी 32 महिन्यांचा कालावधी ठरवण्यात आलाय. त्यानंतर मात्र भारतीय जवानांच्या हातात हे नवं शस्त्र दिलं जाईल.

एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम
पुतीन यांची कोरोना काळानंतरची ही पहिली विदेश दौरा आहे. त्यासाठी त्यांनी भारताला निवडलं यावरुन तिचं किती महत्व आहे याचा अंदाज येतो अशी प्रतिक्रिया रशियन राजदूतांनी दिलीय. गेल्या काही काळात पाक आणि चीन विशेषत: चीनकडून सीमावर्ती भागात ज्या कुरापती वाढल्यात, त्यावरुन धोका निर्माण झालाय. चीन काही ठिकाणी हल्ला करण्याची योजना करतोय असा जाणकारांचा अंदाज आहे. त्याला उत्तर देण्यासाठीच भारतानं रशियाकडून एस-400 (S-400 Defense Missile) ही मिसाईल डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याचा निश्चय केलाय. त्यावरच आज शिक्कामोर्तब होईल. ही डिफेन्स सिस्टीम आल्यानंतर भारतीय आकाशाला कवचकुंडलं मिळतील. कारण कुठल्याही क्षमतेचे मिसाईल हाणून पाडण्याची क्षमता ह्या डिफेन्स सिस्टीममध्ये आहे. ही सिस्टीम एवढी मजबूत मानली जातेय की त्यावर अमेरीकेनं आक्षेप घेतलाय. काही निर्बंध लादण्याचीही अप्रत्यक्ष घोषणा केलीय पण भारतानं असे कुठलेही इशारे सहन करणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

हे सुद्धा वाचा:

निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ‘या’ खास पेयांचा आहारात समावेश करा!

आगरी समाजावर पीएचडी निमित्त प्राध्यापकाचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत; वर्गमित्राच्या कौतुकाला आमदार राजू पाटील हजर

Param Bir Singh | परमबीर सिंह यांना अटकेची धाकधूक, सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ मिळणार?