युक्रेनवर एकामागून एक हल्ले करणारा रशिया लवकरच युक्रेनची (Ukraine) राजधानी कीव ताब्यात घेऊ शकते. गेल्या तीन दिवसांपासून रशियन सैन्यानं (Russian Army) युक्रेनला चारही बाजूंनी घेतलं असून युक्रेनच्या सैन्यावर मागे हटण्यासाठी दबाव टाकला जात आहे. युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमिर जेलेंस्की यांनीही कीववर रशियन लष्कर ताबा घेऊ शकते, अशी शंका व्यक्त केला आहे. पुतिन यांच्या नेतृत्वात रशियन सैन्यासमोर युक्रेनला नतमस्तक व्हायला लावूच, असा चंग बांधलेले पुतिन (Vladimir Putin)हे अत्यंत कठोर आणि धोकादायक नेते आहेत, असं म्हटलं जातं. याचाच दाखला देणारा, युद्धापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. युक्रेनवर हल्ला करण्याच्या आधी अंतिम बैठकीत पुतिन यांच्यासमोर बोलणारा स्पाय प्रमुखाची बोबडीच वळायचं बाकी होतं.
युक्रेनमधील दोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन शहरांना रशियानं वादाचं केंद्र बनवलं आहे. फुटीरतावाद्यांच्या ताब्यातल्या या दोन प्रांतांनी स्वतंत्र अस्तित्व जाहीर केलं असलं तरी आर्थिक आणि लष्करी पाठबळासाठी ते पूर्णपणे रशियावर अवलंबून आहेत. याचाच फायदा घेत युद्धाच्या आधी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील दोनेत्स्क आणि लुहान्स्क ला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याच्या बैठकीचा हा व्हिडिओ आहे. दोनेत्स्क आणि लुहान्स्कला मान्यता देण्याविषयी रशियाचे स्पाय प्रमुख बोलू लागले, तेव्हा पुतिन यांनी त्यांना तत्काळ गप्प केले. पुतिन यांच्या बोलण्यात धाकच एवढा होता की, त्या गुप्तचर एजन्सीच्या प्रमुखाची बोबडीच वळू लागली.
सदर बैठकीतला प्रसंग दाखवणारा BBC चा व्हिडिओ-
सर्वात खराब परिस्थिती उद्भवली तर दोनेत्स्क आणि लुहान्स्कला या दोन शहरांना मान्यता द्यावी, असं स्पाय प्रमुख बोलत असताना, पुतिन यांनी त्यांना अडवलं आणि विचारलं की, तुम्हाला काय म्हणायाचंय, आपण त्यांच्याशी बातचित सुरु करायला हवी का? हा प्रश्न विचारून पुतिन मिश्कीलपणे हसले आणि स्पाय प्रमुख काय उत्तर देतात, याची वाट पाहू लागले. आपण चर्चा करायची की त्यांच्या सार्वभौमत्वाला मान्यता द्यायची? असं पुतिन यांनी पुन्हा विचारलं, त्यानंतर मात्र स्पाय प्रमुखांची बोबडीच वळली. काय उत्तर द्यावं कळत नव्हतं. अखेर या दोन्ही शहरांना स्वतंत्र म्हणून मान्यता देण्याच्या प्रस्तावाचं मी समर्थन करतो, असं अडखळत अडखळत त्यानं सांगितलं. पुतिन आणि स्पाय प्रमुखांमधला हा संवाद सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यातून पुतिन यांना अधिकारी आणि इतर मंत्री किती घाबरतात, हे दिसून येतंय.
रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडण्यात आला. रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबवावेत, तसेच युक्रेनमधील सैन्य माघारी बोलवावे अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली होती. या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडून सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाच्या बाजून 15 सदस्य देशांपैकी एकूण आकरा देशांनी मतदान केले तर भारत, चीन आणि यूएईने या तीन सदस्य देशांनी हल्ल्याच्या निषेध करत मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे टाळले. तर रशियाने या प्रस्तावाविरोधात आपला व्हटोचा अधिकार वापरला. रशिया या प्रस्तावाच्या विरोधात आपला विशेष अधिकार वापरणार असल्याचा अंदाज सुरुवातीपासूनच लावण्यात येत होता. भारत, चीन आणि यूएईने या मतदान प्रक्रियेत सहभागी न होता अलिप्ततावादी धोरण स्विकारले आहे. मात्र दुसरीकडे पश्चिमेकडील देश रशियाविरोधात चांगलेच आक्रमक झाले असून, सुरक्षा परिषदेने मांडलेल्या या प्रस्तावावेळी रशिया एकटे पडल्याची टीका त्यांनी केली आहे.
इतर बातम्या-