लाहोर : पाकिस्तानात हिंदूंसोबत हिंसाचाऱ्याच्या अनके घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण जग सुन्न झालंय. या विषयावर जगभरात चर्चा होते. मागे एकदा तर तिथल्या टीव्ही प्रोग्रॅममध्ये हिंदूंवर शिवराळ भाषेत टिप्पणी करण्यात आली होती. पाकिस्तानात हिंदूवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तिथे हिंदूंना तुच्छ मानलं जात. त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली जात. त्यांना त्रास दिला जातो. त्यांची प्रचंड हेळसांड केली जाते. या सऱ्या घटना ताज्या असताना पाकिस्तानात एका हिंदू तरुणीचं मात्र प्रचंड कौतुक केलं जात आहे. या तरुणीने नेमकं असं का केलं की संपूर्ण पाकिस्तान तिच्या कामाचं कौतुक करत आहे? याच बाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Sana Ramchand becomes Pakistani first assistant commissioner from Hindu community).
हिंदू-मुस्लिम भेद विसरुन कौतुक
पाकिस्तानातील या हिंदू तरुणीचं नाव डॉक्टर सना रामचंद असं आहे. ही तरुणी नुकतीच CSS 2020 ची परीक्षा उत्तीर्ण झाली. पाकिस्तानात सना ही पहिली हिंदू महिला आहे, जी असिस्टंट कमिश्नर बनली आहे. तिच्या यशाबद्दल संपूर्ण पाकिस्तानातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्यावर सुरु असलेला कौतुकाचा वर्षाव बघितल्यानंतर एक गोष्टी नक्की लक्षात येते की, एखाद्याला यश आलं की त्या माणसाचा आयुष्याचा वणवास संपतो. तो प्रत्येकाला आपलासा वाटतो. त्याच्याप्रती अनेकांना आपुलकी वाटते. याच कारणामुळे हिंदू-मुस्लिम हा भेद विसरुन पाकिस्तानचे नागरिक आज सनाच्या मेहनतीचं आणि कामाचं कौतुक करत आहेत.
‘मी यशस्वी होणार, अशा विश्वास होता’
“मला मिळालेल्या यशाबद्दल मी खूप आनंदी आहे. मला मिळालेलं हे यश मला आश्चर्यचकीत अजिबात वाटत नाही. कारण मी तितकी मेहनत घेतली होती. त्यामुळे मला यश मिळेल हे निश्चित होतं. मला लहानपणापासून शिक्षणात यश येत गेलंय. मी नेहमी शाळेत पहिल्या क्रमांक पटकवायची. FCPS परीक्षेतही मी मेरीटमध्ये आली होती. त्यामुळे CSS परीक्षा उत्तीर्ण होणार, असा मला विश्वास होता”, अशी प्रतिक्रिया सनाने एका वृत्तवाहिनीला दिली (Sana Ramchand becomes Pakistani first assistant commissioner from Hindu community).
पाकिस्तानातील हिंदू समुदायाकडून सनाचं कौतुक
सनाने कोणत्याही शिकवणी शिवाय हे यश मिळवलं आहे. ती कराची इथे वास्तव्यास आहे. तिने फक्त मुलाखतीसाठी शिकवणी लावली होती, असंदेखील तिने सांगितलं. तिला मिळालेल्या या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील हिंदू समाजही तिचं कौतुक करत आहे. कारण पाकिस्तानात खूप कमी हिंदू महिलांना यश संपादित करण्यात यश आलेलं आहे. सनाचं सोशल मीडियावर देखील कौतुक केलं जात आहे.
Amidst all the unusual news every day, let’s congratulate Dr #SanaRamchand— the first Hindu female for successfully qualifying #CSS2020Exam, and appointed as an Assistant Commissioner.
Proud for All theHindu Community ?#ProudPakistan #SanaRamchand @khaneshrathi pic.twitter.com/kIWSKZNbOT
— Dr….Mathan? (@MathanMaheshwa4) May 6, 2021
हेही वाचा : चीनचं ‘ते’ अनियंत्रित रॉकेट नेमकं कधी पृथ्वीवर पडू शकतं? जीवसृष्टीला धोका काय?