Satya Nadella: भारतीय वंशाचे सीईओ सत्या नादेला, सुंदर पिचई अन् शांतनू नारायण कोणाला मिळतो जास्त पगार?

| Updated on: Oct 27, 2024 | 10:20 AM

Satya Nadella sundar pichai: मायक्रोसॉफ्ट सोबतच गुगल, अडोब, मायक्रोटेन आणि आयबीएम देखील त्यांच्या सीईओंना प्रचंड पगार आहे. सुंदर पिचाई यांच्यानंतर सत्या नदेला यांना सर्वाधिक पगार मिळतो. अडोबचे शंतनू नारायण तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना वर्षाला 300 कोटी रुपये पगार मिळतो.

Satya Nadella: भारतीय वंशाचे सीईओ सत्या नादेला, सुंदर पिचई अन् शांतनू नारायण कोणाला मिळतो जास्त पगार?
Satya Nadella sundar pichai
Follow us on

भारतीय वंशाचे अनेक सीईओ अमेरिकेत कार्यरत आहे. सीईओ सत्या नादेला, सुंदर पिचई अन् शांतनू नारायण यांच्यासारखे सीईओ दिग्गज कंपन्यांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. यामध्ये कोणाला किती पॅकेज मिळते याचे आकडे कोट्यवधीच्या घरात आहेत. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नदेला यांचे वार्षिक पॅकेज 666 कोटी आहे. सत्या नदेला यांचे पॅकेज समोर आल्यानंतर जगात कोणत्या सीईओला किती पगार आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या सीईओला पगार किती? याची उत्सुक्ता आहे.

पहिल्या क्रमांकावर सुंदर पिचाई

सत्या नदेला यांच्यासोबत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, अडोबचे सीईओ शंतनू नारायण, मायक्रोटेनचे संजय मेहरोत्रा ​आणि आयबीएमचे अरविंद कृष्णा हे देखील भारतीय वंशाचे सीईओ आहेत. त्यांचे वेतन अनेकदा चर्चेत असतात. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना सध्या सर्वाधिक वेतन दिले जात आहे. त्यांचे वेतन 1846 कोटी रुपये आहे. सत्या नदेला यांच्यापेक्षा तीन पट जास्त पगार त्यांना आहे.

सत्ता नदेला यांनी कमी केला पगार

सत्या नदेला यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी ज्वाईन केल्यानंतर सर्वाधिक वेतन घेणारे ते दुसरे व्यक्ती ठरले आहे. यापूर्वी 2014 मध्ये त्यांना 84 मिलियन डॉलर पगार होता. परंतु मागील वर्षी त्यांचे वेतन 48.5 मिलियन डॉलर (408 कोटी) रुपये होते. त्यांनी स्वत: आपले पॅकेज कमी केले होते. इतर अधिकाऱ्यांना जास्त बोनस मिळावा म्हणून त्यांनी पॅकेज कमी केले होते.

हे सुद्धा वाचा

असा आहे इतरांचा पगार

मायक्रोसॉफ्ट सोबतच गुगल, अडोब, मायक्रोटेन आणि आयबीएम देखील त्यांच्या सीईओंना प्रचंड पगार आहे. सुंदर पिचाई यांच्यानंतर सत्या नदेला यांना सर्वाधिक पगार मिळतो. अडोबचे शंतनू नारायण तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना वर्षाला 300 कोटी रुपये पगार मिळतो. मायक्रॉन टेकचे सीईओ संजय मेहरोत्रा ​​यांनाही चांगले पॅकेज मिळते. त्यांचा वार्षिक पगार 206 कोटी रुपये आहे. आबीएमचे अरविंद कृष्णा 165 कोटी पगारासह पाचव्या स्थानावर आहेत. टेक कंपन्यांच्या या दिग्गज सीईओंना पगारासोबत शेअर्सही मिळतात. कंपनीच्या शेअरची किंमत वाढली तरी त्यांना खूप फायदा होतो.