नवी दिल्ली : हमासच्या हल्ल्यामुळे खवळलेला इस्रायल सध्या कोणाच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीय. काहीही करुन इस्रायलला बदला घ्यायचा आहे. त्यामुळे इस्रायलने गाझा पट्टीत Action सुरु केली आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीत सातत्याने बॉम्बफेक सुरु आहे. हमासच्या तळांना इस्रायल लक्ष्य करत आहे. पण यामध्ये अनेक नागरिक सुद्धा मारले जात आहे. इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यात अनेक निष्पाप पॅलेस्टिनी नागरिकांनी प्राण गमावले आहेत. इस्रायलच्या या Action मुळे अरब जगतात संतापाची भावना आहे. अनेक अरब आणि मुस्लिम देशांनी इस्रायलच्या कारवाईला विरोध केलाय. आता इस्रायल विरोधात दोन मोठे देश एकत्र आले आहेत. त्यांनी हातमिळवणी केलीय. त्यामुळे येणाऱ्या दिवसात इस्रायलचा त्रास आणखी वाढू शकतो.
इस्रायलकडून सुरु असलेल्या हल्ल्यांविरोधात इराण आणि सौदी अरेबिया हे दोन देश एकत्र आले आहेत. इराणचे राष्ट्रपती आणि सौदी क्राऊन प्रिन्सने टेलिफोनवरुन चर्चा केली. इस्रायलच्या युद्ध गुन्ह्यांपासून पॅलेस्टिनी नागरिकांना वाचवण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलाय. सौदी अरेबिया आणि इराणचे संबंध व्यवस्थित झाल्यानंतर पहिल्यांदा दोन्ही नेत्यांनी फोनवरुन चर्चा केली. रायसी आणि सौदी क्राऊन प्रिन्सने पॅलेस्टाइन विरोधात युद्ध गुन्हे संपवण्यासाठी चर्चा केली. सौदी मीडियाने सुद्धा या ऐतिहासिक फोन कॉलच वृत्त दिलय. इस्रायल-हमास युद्ध सुरु झाल्यापासून सौदी अरेबिया क्षेत्रीय नेत्यांच्या संपर्कात आहे. क्राऊन प्रिन्स आणि इब्राहिम रायसी यांची चर्चा ही ऐतिहासिक घटना आहे.
चीनने मध्यस्थता केली. सौदी अरेबिया आणि इराण संबंधात मागच्या सात वर्षांपासून सुरु असलेला तणाव संपवला. इराण आणि सौदीच्या तणावामुळे खाडीमध्ये अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झाली होती. दोन्ही देशाच्या बिघडलेल्या संबंधांमुळे येमेन ते सीरियापर्यंत नव्या युद्धाची सुरुवात झाली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “हमास विरुद्ध इस्रायलने पुकारलेल्या युद्धाच अमेरिकेने समर्थन केलय. त्याचवेळी सौदी शासकांच्याही संपर्कात होतो”